आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया काळात आपले-परके असण्याची व्याख्या बदलली आहे, नात्यांचे रूप बदलले आहे. आता जो कामी येईल, तोच आपला आहे. आणि जो कामी येणार नाही, तो परक्यापेक्षाही परका. आधी आपले लोक, एका ठिकाणी मोठ्या संख्येने जेथे आढळायचे त्याचे नाव होते लग्न समारंभ. आधीच्या लग्नात बजेटवरून किती लोकांना बोलवायचे हे ठरायचे. अनेक जण बजेटवरून पाहुण्यांना बोलवायचे. नंतर आजारामुळे पाहुणे कमी वा जास्त झाले. मात्र आता बजेटच्या चारपट जास्त खर्च करूनही लग्नात मर्यादित पाहुणे बोलवले जातात. काही लग्ने अशी असतात, ज्यात पाच-सात उत्सवांपैकी एकावरच एवढा पैसा खर्च केला जातो की, लहान- मोठ्या गावातील अनेक मुलींची लग्ने होतील. मात्र पाहुणे मर्यादित असतात. म्हणून हळूहळू जी संधी, जी आपल्यांशी जोडायची, ती हळूहळू आपलेपणा विसरत जात आहे. लग्न असा प्रसंग होता, ज्यात तुमचे नाते सुधारायचे. त्यात नवेपणा आणू शकायचे. आता तर हा प्रसंगही समीकरण झाले आहे.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.