आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिका आणि चीनच्या संबंधांमध्ये अनेक वर्षांच्या तणाव आणि अविश्वासानंतर सुधारणा होण्याची आशा दिसत होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये शिखर संमेलन झाले होते. इकडे, चीनने जगातील सर्व देशांसोबतच संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटी ब्लिंकेनही या आठवड्यात बीजिंग जाणार होते. मात्र, अमेरिकेभोवती अनेक दिवस फिरणाऱ्या एका बलूनमुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले.
मोंटानामध्ये चीनचा फुगा दिल्यानंतर ब्लिंकन यांचा दौरा रद्द करण्यात आला. यातून पुन्हा एकदा दोन महाशक्तींमधील कमकुवत संबंध समोर आले. शनिवारी अमेरिकेने कॅरोलिना किनाऱ्यावर क्षेपणास्त्राद्वारे बलून पाडले. फुग्यापासून अमेरिकेला गंभीर लष्करी धोका होता असे संकेत नव्हते. आशिया सोसायटी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या संचालक रोरी डेनियल्स सांगतात, या लहान कारवाईचे परिणाम मोठे आहेत. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये संपर्क कमी असल्याने राजनैतिक संकटाच्या वेळी एकमेकांच्या हेतूंचा अंदाज घेणे कठीण झाले आहे. फुगा प्रकरणाच्या काही महिने आधी चिनी मुत्सद्द्यांनी अमेरिकेविरोधात आक्रमक वक्तव्य करणे बंद केले होते. चीनचे भावी परराष्ट्र मंत्री क्विन गांग यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेतील राजदूत पदावरून निरोप घेण्याआधी दोन्ही देशांच्या लोकांमध्ये सामंजस्य वाढवण्याचे आवाहन केले होते. सध्या चीनचे लक्ष त्यांची कमकुवत अर्थव्यवस्था सुधारणे आणि कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती सांभाळण्याकडे आहे. यामुळे तो दुसऱ्या देशांसोबत तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी जागतिक इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत उपपंतप्रधान लियू ही यांनी सांगितले की, व्यवसायासाठी चीन पुन्हा खुला झाला आहे.
विश्लेषक सांगतात, अशा स्थितीत चीनचा हेरगिरी फुगा अमेरिकेच्या आकाशात उडाल्याने चीन सरकारात त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धीबाबत धोरणात मतभेद दिसून येतात. ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटमध्ये सिनिअर फेलो रायन हास सांगतात, चीनच्या राजनैतिक संदेशातून जाणवत होते की त्यांना अमेरिकेसोबतचे तणाव कमी करायचे आहेत. फुग्याची घटना या संकेतांपासून एकदम विपरीत आहे. यामुळे चीनच्या सिक्युरिटी सिस्टिममधील समन्वयावरही प्रश्न निर्माण होत आहेत. इतर तज्ञ म्हणतात, चीनने फुग्याद्वारे संदेश दिला आहे की, तो अमेरिकेच्या आतपर्यंत हेरगिरी करू शकतो. राजारत्नम इंटरनॅशनल स्टडीज स्कूल सिंगापूरचे बेंजामिन हो यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेपासून मागे नाही असे चीन दाखवू इच्छितो. यामुळे देशात राष्ट्रपती शी जिनपिंग यांची लोकांमध्ये पत वाढेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.