आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:पशुखाद्य हे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवे संकट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत २१६ दशलक्ष टन दूध उत्पादनासह जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पण, आज पेंढ्यांचा भाव जवळपास गव्हाच्या किमतीएवढा आहे. याचा अर्थ देशातील सर्व ८.३ कोटी दूध उत्पादकांसाठी अल्पकालीन योजना आणणे निकडीचे आहे. या शेतकऱ्यांना अनुदानाची गरज आहे, जेणेकरून ते महागडे खाद्य व जनावरांसाठी चारा खरेदी करू शकतील. दुसरे म्हणजे खुज्या जातीच्या नवीन बियाण्यांमुळे मुख्य पिकांची झाडे छोटी असतात आणि शेतीचे यांत्रिकीकरण वाढल्यामुळे शेतीत बैल-म्हशींची गरजच उरली नाही. गायींच्या वंशाप्रती नव्या जागृतीचा परिणाम असा झाला की, कत्तलखाने बंद झाले आणि मोकळे प्राणी रात्रभर पीक फस्त करू लागले. परदेशात दुधाची किंमत कमी आहे, कारण तेथे कुरणासाठी जमीन दिली जाते आणि दुभत्या जनावराला भरपूर अनुदान मिळते. यावर्षी देशात चाऱ्याचेही संकट निर्माण झाले आहे, कारण लागवडीखालील क्षेत्र घटले असून जनावरांना चारा देणारी बाजरी अतिपावसामुळे मुळापासून उन्मळून शेतातील पाण्यात कुजू लागली आहे. तसेही हार्वेस्टरद्वारे स्वस्तात कापणी करण्याच्या नादात शेतकरी शेतातील धान्य कापल्यानंतर उभी धसकटे जाळतात, त्यामुळे पेंढ्या क्वचितच मिळतात. जरा विचार करा, दूध आणि पेंढ्यांच्या दरातील तफावत केवळ नाममात्र असेल, तर शेतकरी पशुपालनावर आपला उदरनिर्वाह कसा करणार?

बातम्या आणखी आहेत...