आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएखाद्या वेळी फोटो काढायचा म्हणून काढला जातो. त्या वेळी त्या फोटोतले बारकावे विशेष लक्षात येत नाहीत. मात्र सावकाश, निवांत क्षणी हे फोटो निरखून बघितल्यावर त्यातले अनेक कंगोरे समोर येतात. अशाच एका अस्वस्थ करणाऱ्या फोटो फ्रेमचा हा अनुभव...
थो डेसे चेंज म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात फिरत असताना हिरव्या रंगाचा पॅच असलेले एखाद्या ख्यातनाम चित्रकाराने चितारलेले अमूर्त चित्र असावे, असे सुंदर निसर्गचित्र माझ्या दृष्टीस पडले. मला मोह आवरला नाही. मी गाडीचा वेग कमी केला अन् ते दृश्य कॅमेऱ्यात टिपले.
नंतर निवांत वेळ मिळाल्यानंतर दिवसभरातील फोटो पाहत असताना हिरवा पॅच असलेला फोटो जरासा निरखून पाहिला आणि मी अस्वस्थच झाले. कारण हा फोटो म्हणजे फक्त छान कंपोज फ्रेम नाही तर माणसाने स्वत:च्या स्वार्थापोटी केलेल्या निसर्ग हानीचे ते प्रतीक होते. त्यामध्ये काही तुकड्यात हिरवळ, तर काही तुकड्यात भिंत उभारण्याचे काम चालू होते. पुढे एक दिवस तिथे टोलेजंग इमारत उभी राहणार होती.
परंतु या चित्रातील हिरवळ आणि भिंत हे जणूकाही मानव व पर्यावरण यांचे द्वंद्वच आहे की काय असे वाटू लागले. मानवी हस्तक्षेपामुळे तापमान वाढले. पाऊस अवकाळी पडू लागला, कुठे सुनामी येऊ लागली, कुठे वादळ, तर कुठे अचानक वणवे पेटू लागले. या निसर्गाच्या पोटीच माणसाने जन्म घेतला आहे. या निसर्गानेच त्याला अन्न-पाणी दिले आहे. या निसर्गामुळेच माणसाचे जीवन सुखी झाले आहे. पण माणूस हे सगळं विसरून निसर्गाचा संहार करत सुटला आहे. माणसाच्या या हव्यासामुळे, अवाजवी हस्तक्षेपामुळे या सुंदर निसर्गास आपण मुकणार आहोत. या निसर्गातील प्रत्येक गोष्ट मोलाची आहे. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात -
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।।
प्रियंका सातपुते - संपर्क : ७३८५३७८८५६
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.