आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Aasmaan Se Aaya Farishta... Why Were Sharmila's Mid Shots Taken In The Song?

कुछ दिल ने कहा:आसमान से आया फ़रिश्ता, प्यार का सबक़ सिखलाने... या गाण्याने का उडाली खळबळ?

अन्नू कपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘आसमान से आया फ़रिश्ता प्यार का सबक़ सिखलाने...’ या गाण्यात शर्मिला टागोर वॉटर स्किइंग करताना दिसत आहेत. परंतु, हा त्यांचा मिड शॉट होता, ज्यात त्या अपर टोरसोमध्ये (वरचा भाग) एका बिकिनीत आहेत. त्यांना संपूर्ण न दाखवण्यामागचे एकमेव कारण म्हणजे, त्यांना वॉटर स्किइंग येत नव्हते.

आज रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. त्यांचा जन्म ७ मे १८६१ ला कोलकाता येथे झाला आणि तीन देशांच्या राष्ट्रगीतांची रचना करणारे ते बहुधा एकमेव कवी आहेत. पहिले, भारताचे राष्ट्रगीत - जन गण मन अधिनायक जय हे! दुसरे, बांगलादेशचेे राष्ट्रगीत - आमार शोनार बांगला, आमी तोमाय भालो बाशी, चिरोदिन तोमार आकाश, तोमार बाताश, आमार प्राणे बाजाए बांशी। आणि तिसरे म्हणजे, श्रीलंकेचे राष्ट्रगीत -

श्रीलंका माता, अपा श्रीलंका नमो नमो नमो नमो माता सुन्दरा श्रीबरिनी, सुरेन्दी अति सोभामय लंका, धन्य धन्य नेका मलपालातुरु पीरी जया भूमिका रम्या अपा हता सय्या सीरी सेता सदना, जीवानए माता! या गीताचे श्रेय अप्रत्यक्षपणे टागोर यांना दिले जाते, कारण श्रीलंकेच्या राष्ट्रगीताचे संगीतकार आनंदा समाराकून हे विश्वभारती शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ यांचे विद्यार्थी होते आणि अनेकांच्या मते, हे गीत आनंदाने लिहिले असले, तरी ते रवींद्रनाथ टागोर यांनीच स्वरबद्ध केले होते. नोबेल पारितोषिक मिळालेले पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर!

टागोरांचे मोठे होते भाऊ द्विजेंद्रनाथ टागोर, ज्यांच्या मुलीच्या मुलीचे नाव लतिका बरुआ होते आणि लतिका बरुआ यांची मुलगी इरा बरुआ हिचा विवाह टागोर कुटुंबातील गीतिंद्रनाथ टागोर यांच्याशी झाला होता. आज मी इरा बरुआ आणि गीतिंद्रनाथ टागोर यांच्या मुलीची कथा सांगणार आहे, जी हिंदी-बांगला चित्रपटांची एक खूप मोठी नायिका होती. हे नाव आजही प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे शर्मिला टागोर.

शर्मिलाची चित्रपट कारकीर्द बहरात असताना एके दिवशी शर्मिला आणि प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांची दिल्लीत भेट झाली. त्या वेळी मन्सूर अली खान सिमी गरेवाल यांच्या प्रेमात बुडाले होते. असे असले तरी शर्मिला आणि मन्सूर यांच्यात आकर्षण निर्माण झालेच. त्या जाळ्यात अडकल्यावर कोणत्याही वयात प्रेम, इच्छा होतातच. तेव्हा तर शर्मिला आणि मन्सूर तरुण होते. कायम एकत्र राहण्याचे स्वप्न उराशी बाळगून दोघांनीही घाईघाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मन्सूर अली खान पतौडी यांची वंशावळ आई-वडील अशा दोन्ही बाजूंनी राजघराण्यातील होती. वडील इफ्तिखार अली खान हरियाणातील पतौडी संस्थानाचे नवाब होते, तर मन्सूरची आई संजीदा बेगम त्यांचे वडील नबाब हमीदुल्लाह यांच्या निधनानंतर भोपाळ संस्थानाच्या गादीवर विराजमान होऊन १२ व्या नवाब बेगम झाल्या होत्या. माझ्या मते, मुलीला संस्थानाच्या गादीवर बसवणे हे अत्यंत पुरोगामी आणि स्त्रियांबाबत उदार दृष्टिकोनाचे लक्षण होते. बहुधा रझिया सुलताननंतर भोपाळमध्येच एका महिलेला नवाब बनवण्यात आले असेल.

तर १९६७ मध्ये एका चित्रपटात शर्मिला टागोर यांनी टू पीस बिकिनी घालून काही शॉट्स दिले होते. मला तुम्हाला सांगायचे आहे की, "अॅन इव्हनिंग इन पॅरिस' या चित्रपटातील गाणे पाहा, ज्याचे बोल आहेत- ‘आसमान से आया फ़रिश्ता प्यार का सबक़ सिखलाने...’

शर्मिला टागोर या गाण्यात वॉटर स्किइंग करताना दिसत आहेत, परंतु हा त्यांचा मिड शॉट होता, ज्यात त्या अपर टोरसोमध्ये (वरचा भाग) एका बिकिनीत आहेत. त्यांना संपूर्ण न दाखवण्यामागचे एकमेव कारण म्हणजे, त्यांना वॉटर स्किइंग येत नव्हते. परंतु, जशी बोट वुडन जेटवर पोहोचते, तेव्हाच दिग्दर्शक शर्मिला यांना बिकिनीच्या फुल फिगर शॉटमध्ये दाखवतात. तेव्हा तिथे गाण्याचा अंतरा सुरू होतो...

‘साया हूं मैं तेरा, तेरे साथ ही आऊंगा..' याशिवाय, आणखी एका गाण्यात त्या कॅब्रे वेशभूषेत असून, ते "झुबी झुबी जालेम्बू' हे गाणे आहे. पण, चित्रपटाच्या प्रमोशन आणि प्रचारासाठी त्यांनी बिकिनी परिधान करून फुल फिगर फोटोशूट करून घेतले होते, ज्याचे पोस्टर देशभरात लावले गेले होते.

पण, त्या वेळी शर्मिला यांच्या आयुष्यात या बिकिनी फोटोशूटने किती गोंधळ निर्माण केला होता, हे मी पुढच्या आठवड्यातील लेखात मांडणार आहे.

आणि हो, मी सांगू इच्छितो की, पुढचा लेख हा माझा शेवटचा असेल. कारण वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे आपल्या सेवेसाठी मी असमर्थ आहे. आजसाठी एवढेच. शुभेच्छा! जय हिंद ! वंदे मातरम!

अन्नू कपूर
सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि सूत्रसंचालक