आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Are Modern Humans Really Capable Of Multitasking? | Article By Dr. Pravin Za

यंग इंडिया:मल्टिटास्किंगमध्ये आधुनिक मानव खरोखर सक्षम आहे का?

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले तेव्हा त्यांच्या आत्मचरित्रावर काम करणारे प्रसिद्ध आत्मचरित्रकार व लेखक वॉल्टर आयझॅकसन यांनी एक मनोरंजक मुद्दा शेअर केला. त्या दिवशी मस्क यांची एका इंडोनेशियन मंत्र्यासोबत टेस्ला कंपनीची बैठक झाली आणि रात्री दहा वाजता ते स्पेस एक्स कंपनीत रॉकेट इंजिनवर चर्चा करत होते. जगभरात या कार्यक्रमावर लाखो ट्विट झाले असताना एलन मस्क यांनी संपूर्ण बैठकीत एकदाही ट्विटर हा शब्द वापरला नाही. ते फक्त तिथे काय करायला आले होते याबद्दल बोलले. वॉल्टर आयझॅकसनने याचा उल्लेख करून लिहिले - एलन मस्क मल्टिटास्क करू शकतात! ते एकाच वेळी जगातील तीन मोठ्या कंपन्या हाताळू शकतात.

परंतु, या घटनेकडे पुन्हा नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की, मस्क प्रत्यक्षात एकाच वेळी तीन गोष्टी करत नव्हते. त्याउलट एक गोष्ट करताना त्यांनी दुसरी गोष्ट मनातून पूर्णपणे काढून टाकली होती. त्यांचे लक्ष सतत एका कामात असायचे. आजच्या जगात गाडी चालवताना फोनवर बोलणारे अनेक लोक दिसतात. टीव्हीवर फुटबॉलची मॅच पाहताना ते पुस्तक वाचतात. एका हाताने जेवताना दुसरा हात संगणकावर काम करत असतो किंवा मोबाइलवर काही तरी पाहत असतो. आज प्रत्येक जण अष्टभुजा बनण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्यांची एकूण उत्पादकता वाढेल. पण, त्यामुळे खरोखरच उत्पादकता वाढते का? संशोधनात म्हटले आहे की, मानवी मेंदू एकाच वेळी अनेक गुंतागुंतीची कामे करण्यासाठी तयार केलेला नाही. संगीत ऐकताना वाचता येते, पण गणिताचे प्रश्न सोडवताना इतिहास वाचता येत नाही. आपण एका टास्कमधून दुसऱ्या टास्कवर वारंवार स्विच करत असू, तर प्रत्येक टास्कमध्ये आपले आउटपुट कमी होईल. आपले लक्ष आणि केंद्रितता खंडित होईल. सरतेशेवटी, परिणाम असा होऊ शकतो की, एक कामदेखील योग्यरीत्या झाले नाही.

इमर्जन्सी वॉर्डमधील डॉक्टर एकामागून एक वेगवेगळ्या रुग्णांकडे धाव घेतात, परंतु असे करत असताना त्यांचे लक्ष खूप नियंत्रित असते. आपल्याला ते घाईत दिसतात, परंतु त्यांचा मिनिटामिनिटाचा फोकस निश्चित असतो. तसे न झाल्यास रुग्णांचा जीव धोक्यात येईल. एकाच व्यक्तीला एका दिवसात अनेक वेगवेगळी कामे पूर्ण निष्ठेने करणे शक्य आहे, परंतु प्रत्येक काम सारखेच लक्ष देऊन करणे आवश्यक आहे. ती एकमेकांत मिसळू नयेत.

एक सूचना म्हणजे प्रत्येक गुंतागुंतीच्या कामासाठी किमान वीस मिनिटे द्यावीत. उदा. चार वेगवेगळ्या विषयांची पुस्तके दोन तासांत वाचायची असतील तर त्यांची प्रत्येकी अर्ध्या तासात विभागणी करावी. फक्त पाच मिनिटांत स्विच करू नये. माझ्याशी झालेल्या चर्चेत एका संगीतकाराने सांगितले की, ते एका कार्यक्रमात चार वेगवेगळ्या मूड्सचे राग गातात त्या वेळी ते दुसऱ्या रागामध्ये येतात तेव्हा मनात पहिल्या रागाचा ठसा उमटू नये, हे ते लक्षात ठेवतात! मल्टिटास्किंगचे सूत्रदेखील काहीसे असेच आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) डॉ. प्रवीण झा नॉर्वे येथील लेखक-डाॅक्टर doctorjha@gmail.com

बातम्या आणखी आहेत...