आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट:हिंदी चित्रपटांत दाखवले जाणारे विद्यार्थी वास्तवात असतात का?

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या डोळ्यांसमोर टाटा नावाचा ट्रस्ट फंड आणि बाटा नावाचा स्कॉलरशिप ग्रुप आहे. मुली हर्मीस बॅग्ज घेऊन फिरतात आणि गुच्चीचे कपडे घालतात. मुलांना वेम्बले येथे परफॉर्म करणारे रॉकस्टार व्हायचे आहे किंवा ५०० विलीनीकरण विनंत्या आकर्षित करणाऱ्या स्टार्टअपचे संस्थापक बनण्याची इच्छा आहे. करण जोहरच्या जगात तुमचे स्वागत आहे. हे वर्ष २०१२ आहे आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तुम्ही याला करण जोहरच्या १९९८ मध्ये आलेल्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात दाखवलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अद्ययावत आवृत्ती म्हणू शकता, तथापि त्यात दाखवलेेले महाविद्यालयसुद्धा इतके स्टिरिओटाइप होते. हो, २०१९ मध्येही ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ नावाचा एक चित्रपट आला होता, त्यामध्ये आपली देशी कबड्डीही हवाहवाई खेळासारखी दाखवण्यात आली होती. दीर्घ काळापासून भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थी बेव्हर्ली हिल्स आणि आर्चीज कॉमिक्सपासून प्रेरित असल्याचे चित्रित केले गेले आहे. झोया अख्तरने ‘द आर्चीज’चा रिमेक बनवला आहे, तो पुढील वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. तो ही परंपरा आणखी मजबूत करणार आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सर्व स्टारकिड्स आहेत, त्यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे. राणी मुखर्जीच्या शैलीत भजन करून घेतले नाही तर हे कलाकार त्यांच्या मूळ रूपात दाखवले जातील, अशी आशा नाही.

अलीकडेच मी चंदीगड संगीत आणि चित्रपट महोत्सवादरम्यान चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांच्याशी बोलत होतो. ‘बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम’ दिग्दर्शित केल्यानंतर अग्निहोत्री यांनी चार वर्षे देशभर प्रवास केला आणि विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये भाषणे दिली. या सर्व ठिकाणी विद्यार्थी हुशार, जिज्ञासू आणि प्रश्न विचारण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी सिनेमात विद्यार्थ्यांचे चित्रण ज्या पद्धतीने केले जाते त्यापेक्षा खूप वेगळे. या विद्यार्थ्यांना पाहून देशात गंभीर आणि विचार करायला लावणारा सिनेमाचा प्रेक्षक असल्याची खात्री पटली. पण, स्वतः अग्निहोत्रींनी त्यांच्या सिनेमात दाखवलेले कॉलेज कॅम्पस सत्यापासून दूर आहे. ‘कश्मीर फाइल्स’मधील विद्यापीठ जेएनयूवर आधारित आहे, त्यात कट्टरपंथी शिक्षक आणि ब्रेनवॉश केलेले विद्यार्थी आहेत. त्यांना देशद्रोही भूमिकेत कुशलतेने बसवले आहे.

बॉलीवूडमधील महाविद्यालयीन विद्यार्थी नेहमीच दोन टोकांमध्ये झुलत असतात. एक तर त्यांना पाश्चात्त्य प्रभावाखाली वाढलेले उबेर-कूल विद्यार्थी किंवा डाव्या-उदारमतवादी विचारसरणीच्या कट्टरपंथी कठपुतळी म्हणून चित्रित केले जाते. बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांनी या दोन प्रकारच्या व्यक्तिरेखांच्या अतिरेकातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी ‘३ इडियट्स’ आणि ‘रंग दे बसंती’ सारखे उत्कृष्ट चित्रपट बनवले. सहसा आपल्या चित्रपटांमध्ये दाखवलेले विद्यापीठ परिसर आणि त्यातील राजकीय उपक्रम कोणत्याही प्रेम त्रिकोणाच्या उदयास हातभार लावतात, मग ते ‘हासील’चे अलाहाबाद विद्यापीठ असो किंवा ‘रांझणा’चे जेएनयू असो. मग आपल्याला १९६३ मधील ‘मेरे मेहबूब’सारखे चित्रपट आठवू लागतात, त्यात विद्यार्थी एकमेकांच्या काव्यमय स्वभावाच्या प्रेमात पडले होते. त्यात नायक अन्वर मियाँ एका मुशायऱ्यात एक नज्म गाऊन त्याची प्रेमिका हुस्ना बानोला शोधतो व तिला हाक मारतो- ‘याद है मुझको मेरी उम्र की पहली वो घड़ी, तेरी आंखों से कोई जाम पिया था मैंने।’ याची पुढील ओळींशी तुलना करा- ‘होता है जो लव से ज्यादा वैसे वाला लव, इश्क वाला लव।’ ही २१व्या शतकातील कविता आहे. आणि त्याचा एकच उद्देश दिसतो - अभ्यासाच्या कटकटीतून सुटका करून विद्यार्थ्यांना प्रेमाच्या दुनियेत घेऊन जाणे! (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

कावेरी बामजई पत्रकार आणि लेखिका kavereeb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...