आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराका माच्या ठिकाणी विविध प्रकारे व्यत्यय येऊ शकतो. तुमच्या वैयक्तिक कारणांमुळेही हेे असू शकते आणि स्वभावामुळेही घडू शकते. सहकाऱ्यांमुळे, कामाच्या ताणाने किंवा गैरव्यवस्थापनामुळेही कामावर परिणाम होऊ शकतो. सोशल मीडियावर वारंवार येणारे मेसेज, ई-मेल आणि फोन कॉल यामुळे लोक कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. कामाच्या ठिकाणी विचलित होण्यासाठी स्वयंव्यवस्थापन हा सर्वोत्तम मार्ग आहे. कोणत्या उपायांनी चांगले काम करू शकाल आणि एक चांगला कर्मचारी होऊ शकाल, हे जाणून घेऊया.
सर्वात पहिली गोष्ट... कामात अडथळे येतील, हे अगदी स्पष्टपणे मान्य करा. त्यातील असे काही असतील, जे तुम्ही थांबवू शकाल. बहुतेक असे असतील, ज्यावर तुमचे नियंत्रण असू शकणार नाही. तुम्हाला फक्त ते टाळण्याचे मार्ग शोधावे लागतील.
प्रभावी तंत्रे कामाचे नियोजन करा बहुतांश कर्मचारी वेळापत्रकानुसार काम करतात आणि त्यांना आगामी काळात काय करायचे आहे, हे माहीत असतेे. अशा परिस्थितीत कॅलेंडर बनवून आपला दैनंदिन प्लॅन तयार करू शकता. यामध्ये यादी बनवून, महत्त्वाची कामे प्राधान्यावर ठेवून उर्वरित वेळेत इतर कामे करता येतील.
पोमोडोरो तंत्र वापरा हे एक वेळ व्यवस्थापन तंत्र आहे, ज्यामध्ये कामाचे तास लहान भागांमध्ये विभागले जातात. २५ मिनिटांना ‘पोमोडोरो’ म्हणतात. यामध्ये अगोदर ध्येय ठरवून कामांची यादी तयार केली जाते. टायमर घेऊन तो २५ मिनिटांसाठी सेट केला जातो. टायमर वाजेपर्यंत एकाच कामावर लक्ष केंद्रित केले जाते.
उठायचे असेल, तर कामाची नोंद करा काही महत्त्वाच्या कामात व्यत्यय येत असेल आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नसेल, तर डेस्कवर एका कागदावर तशी नोंद करून ठेवा. यामुळे परत येताच त्या कामाला तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
आपले वर्तन स्पष्ट बोला आणि नाही म्हणायला शिका : अनेक वेळा ज्यांच्याकडे रिकामा वेळ आहे, त्या कर्मचाऱ्यांना इतरांकडे जाऊन गप्पागोष्टी करायच्या असतात. अशा लोकांना, आपण व्यग्र आहोत, हे तुम्ही नम्रपणे, स्पष्टपणे सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्याकडे खूप काम असेल आणि बॉस तुम्हाला एकामागून एक काम देत असेल, तर त्याला परिस्थितीची जाणीव करून देणे चांगले, अन्यथा तुम्ही चिडचिडे व्हाल आणि वेळेवर काम पूर्ण करू शकणार नाहीत.
सहकाऱ्यांसोबत कामाचे संबंध ठेवा कामाच्या ठिकाणी व्यावहारिक दृष्टिकोन आणि सहकाऱ्यांशी प्रोफेशनल संबंध ठेवा. कोणी तुमचा जवळचा मित्र असला, तरीही त्यांच्याशी जास्त वैयक्तिक वागू नका. विविध संशोधनांतून असे दिसून आले आहे की, कर्मचारी वैयक्तिक बाबींमध्ये स्वतःचा आणि इतर सहकाऱ्यांचा बराच वेळ वाया घालवतात. ऑफिसच्या वेळेनंतर मैत्री निभावली, तर बरे होईल.
प्राधान्य ओळखायला शिका कामाच्या ठिकाणी होणाऱ्या संवादात कोणत्या प्रश्नाला लगेच प्रतिसाद द्यायचा आणि कोणत्या प्रश्नाला नंतर, हे तुम्हाला ठरवायचे आहे. मग तो संवाद सोशल मीडिया, ई-मेल, फोन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून असो. या संदर्भात आपल्याला प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचेे, हे शिकावे लागेल.
समाधान आणि शांतता ब्रेक घेत दीर्घ श्वसन करा विश्रांतीशिवाय दीर्घकाळ काम करणेही थकवणारे असते. यामुळे लक्ष केंद्रित करणे कठीण होते. म्हणून दर तासाला पाच मिनिटांचा ब्रेक घ्या. या दरम्यान थोडे पाणी प्या, दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद करा आणि शरीर सैल सोडा. या ब्रेकनंतर तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकाल.
काम व वैयक्तिक आयुष्यात समतोल कधी कधी, काम आणि वैयक्तिक आयुष्यात (वर्क-लाइफ) संतुलन नसल्यामुळे आपण कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. ऑफिसमध्ये काम करताना घरगुती समस्या आपल्याला त्रास देतात. त्यामुळे अनेकदा आपण ऑफिसचे काम घरीच घेऊन जातो. ऑफिसचे काम ऑफिसपर्यंत आणि घरातील काम आणि व्यवहार घरापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.