आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅसलायटिंग हा भावनिक शोषणाचा एक प्रकार आहे. नातेसंबंधातील जोडीदारांकडून अर्थात पती, पत्नी किंवा जवळच्या मित्राद्वारे हे भावनिक शोषण केले जाते. नात्यात जेव्हा अपेक्षांचे ओझे, अनावश्यक बंधने, बेकायदेशीर वागणूक इ. गोष्टी उद्भवतात तेव्हा त्याचा माणसाच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. काही गोष्टींचा विचार केल्यास, गॅसलायटिंग कसे केले जाते आणि त्याचा कसा परिणाम होतो, हे शोधता येते.
आत्मविश्वास डळमळीत करणे ‘गॅसलायटिंग’ सहन करणाऱ्यांना नेहमीच असे सांगितले जाते, की ते कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक निर्णयात, कामात चूक काढली जाते. यामुळे पीडित व्यक्तीचा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागतो. आणि याचाच फायदा त्रास देणारा घेतो. अपराधीभाव निर्माण करणेे नातेसंबंधांत जोडीदाराचे बोलणे न ऐकल्यास, एखाद्या गोष्टीवर असहमती असल्यास, समोरच्या व्यक्तीला अपराधी असल्याचे भासवले जाते. जसे की, “माझं म्हणणे एेकलं असतं तर असं झालं नसतं..’ अशा प्रकारचे बोलणे एेकावे लागते.
खोटी आश्वासने देणे कर्तव्य किंवा कर्तव्याच्या नावाखाली एखाद्याला अवास्तव स्वप्नं दाखवणे या प्रकाराचाही यात समावेश होतो. उदा. लग्नापूर्वी मोठी आश्वासने देऊन लग्नानंतर मात्र आपल्या मनाप्रमाणे वागावयास लावणे. बंधने घालणे इ.
सहानुभूती दाखवून गैरफायदा घेणेे हे आणखी एक मोठे कारण आहे, ज्याद्वारे गॅसलायटिंग सर्वात जास्त होते. भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करणे, एकटेपणाची तक्रार करून, दुःखी असल्याचे दाखवून, रडून सहानुभूती मिळवणे असे प्रकार यात होतात. अशा वेळी समोरची व्यक्ती तुमच्याकडून काम करून घेते आणि तुम्हाला तो तुमचाच आहे, तुमच्यावर प्रेम करतो, असे भासवते. ‘गॅसलायटिंग’ची लक्षणे गॅसलायटिंगने पीडित व्यक्ती भावना व्यक्त करायला घाबरतात. प्रत्येक चुकीसाठी स्वतःला जबाबदार धरतात. आपणच प्रत्येक वेळी माफी मागायला हवी, असे मानतात. मग चूक कोणाचीही असो. आपले निर्णय चुकीचे आहेत, असे त्यांना सतत वाटत असते. त्यामुळे अशा व्यक्ती स्वत:चे निर्णय समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्यावर सोडून देतात. आपल्याकडून काही चुक झाली तर समोरची व्यक्ती आपल्याला काय बोलेल याबद्दल ‘गॅसलायटिंग’ला बळी पडलेल्या व्यक्ती कायम संभ्रमात असतात. अशा व्यक्ती प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. ‘गॅसलायटिंग’वरील उपाय... { अनैतिक वर्तनाला विरोध : हे शक्य आहे की लोक जाणूनबुजून तुम्हाला दोषी असल्याचे भासवत राहतील. प्रत्येक गोष्टीत सतत तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. परंतु, कोणत्याही अनैतिक किंवा चुकीच्या गोष्टीसाठी गॅसलायटिंगला बळी पडलेल्यांनी स्वतःला दोष देऊ नये. अशा व्यक्तींनी आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादेपलीकडे जाऊन काही करण्याचा, क्षमतेपेक्षा जास्त काही करण्याचा प्रयत्न करू नये.
{ बदलणारे वर्तन स्वीकारू नका : ज्या व्यक्ती अशा प्रकरांना बळी पडतात त्यांच्याबाबतीतले त्रास देणाऱ्यांचे वर्तन शंकेला वाव देणारे असते. गॅसलायटिंग करणाऱ्या व्यक्ती पीडितांशी सकाळी गैरवर्तन करतात. संध्याकाळी भेटवस्तू देतात, तर कधी कधी पीडितांचा अपमान केल्यानंतर काळजी घेत असल्याचा दिखावा, करतात. मात्र, गॅसलायटिंगला बळी पडलेल्यांनी हे असे वर्तन करणाऱ्यांपासून दोन हात दूर राहावे. { स्वत:वर विश्वास ठेवा : लक्षात ठेवा, की तुमचा निर्णय मग तो योग्य असो वा अयोग्य; तो तुमचाच असेल. त्यामुळे तुम्ही जे काही करायचे ते आत्मविश्वासाने करा. इतरांच्या सल्ल्यावर विसंबून राहू नका.
{ समस्येबद्दल बोला : तुमची समस्या स्पष्ट, सोप्या भाषेत आणि वर्तनाने समोरच्या व्यक्तीला सांगा. तरीही समोरच्या व्यक्तीच्या बाजूने गॅसलायटिंग सुरू राहिले, तर मग मात्र तुम्ही परिस्थितीनुसार निर्णय घ्या.
{ हेतू समजून घ्या : चांगली वागणूक ही नेहमी चांगल्या आणि वाईट हेतूनेदेखील येते. लोकांच्या वर्तनाकडे आणि त्यांच्या हेतूकडे लक्ष द्या. वर्तनातील हेतू समजून घेण्याचा आणि त्यानुसार स्वत:चे वागणे ठरवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.