आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:तुमची मुले आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम तर करत नाही ना?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टायगर श्रॉफ जेव्हा कधी रिअॅलिटी शोमध्ये जातो तेव्हा कधी अँकर त्याला शर्ट काढून सिक्स-पॅक दाखवण्याची विनंती करतो. आणि जेव्हा तो असे करतो तेव्हा आपण त्याच्या रेखीव शरीराचे स्त्रिया कौतुक करत ओरडताना ऐकतो. आज देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण मुलांना टायगर श्रॉफसारखे व्हायचे आहे, तर तरुण मध्यमवयीन अधिकाऱ्यांना जॉन अब्राहमसारखे दिसायचे आहेत. अलीकडेच एका कंपनीच्या एचआर विभागातील गैरहजेरीबद्दलचा अहवाल पाहताना मला या कलाकारांची आणि सध्याच्या ट्रेंडची आठवण झाली. दोनपेक्षा जास्त मध्यमवयीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रजा कार्डमध्ये हेच कारण दिले होते – मुलाने स्वतःला खूप जखमी केले आहे. माझी उत्सुकता वाढली. मी त्यांना फोन करून मुलांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची मुले वर नमूद केलेल्या अभिनेत्यांसारखे दिसण्यासाठी वेडे असल्याचे दिसून आले. थोडी अधिक चौकशी केल्यावर आढळून आले की, कोविडपूर्वी मुलांना खेळातही रस होता, पण आता त्यांना फक्त जिमिंगचे वेड लागले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जास्त वर्कआऊट केल्यावर वैद्यकीय मदतीसाठी तरुण जनरल फिजिशियनकडे येत आहेत, यात नवल नाही. हे सर्व २०२० च्या मध्यात सुरू झाले, तेव्हा सर्व जण कोरोनामुळे घरी बसले होते. जागतिक स्तरावर फिटनेस अॅप्सचे डाउनलोड ४६ टक्क्यांनी वाढले असताना भारतात १५७ टक्के डाऊनलोड झाले, त्यामुळे ते ५.८ कोटी वापरकर्त्यांसह जगातील प्रथम क्रमांकाचे आरोग्य अॅप झाले. यामुळे देशातील फिटनेस उपकरणांच्या विक्रीतही वाढ झाली. दुसरीकडे जीवनशैलीच्या आजारांमुळे उद्योजकांनी जिम आणि फिटनेस हब उघडले. प्रशिक्षकांना अचानक जास्त काम मिळू लागले. त्यांनी हळूहळू त्यांची फी वाढवायला सुरुवात केली, त्यामुळे छोट्या छोट्या व्यायामशाळा त्यांना ठेवू शकल्या नाहीत. नियमित व्यायामशाळेत जाणाऱ्यांमध्ये पाठदुखी ही एक सामान्य तक्रार आहे. जर्क, स्क्वॅट्स, डेडलिफ्ट इ. करताना ते जखमी होतात. असे काही व्यायाम आहेत, जे करण्यासाठी उच्चस्तरीय तंत्र आणि निरीक्षण आवश्यक आहे. दुर्दैवाने व्यायामशाळेत जाणाऱ्यांना हे माहीत नसते की, त्यांनी ते योग्यरीत्या केले नाही तर त्यामुळे त्यांच्या कमरेतील स्नायू आणि डिस्कला धोका होऊ शकतो. स्पायनोलॉजी क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी रुग्णांशी केलेल्या संभाषणातून सूचित होते की, वॉर्म-अप आणि कूल-डाऊन न करता आणि स्नायूंच्या ताकदीची पर्वा न करता वेटलिफ्टिंगमुळे समस्या उद्भवू शकतात. गुडघ्याच्या दुखापती आणि स्लिप-डिस्कची वाढती प्रकरणे अतिव्यायामाशी संबंधित आहेत. ऑर्थोपेडिक दवाखान्यांमध्ये कोपरांना दुखापत, स्नायूंवरील ताण, टँडम रप्चर्स इ.चे रुग्ण येत आहेत. तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे की, शरीर व स्नायू पिळदार करण्यासाठी वेळ लागतो, ते एका रात्रीत होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे व्यायामशाळेतही व्यावसायिक प्रशिक्षक आवश्यक असतात. फंडा असा की, शरीर मजबूत आणि आकर्षक बनवण्यासाठी जखमी होऊन बसणे शहाणपणाचे नाही. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, शरीराला इजा झाल्यास मदत करण्यासाठी स्पेअर पार्ट््सची दुकाने उपलब्ध नाहीत.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...