आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:दोघींच्या नजरेतलं खरं स्वातंत्र्य!

एका वर्षापूर्वीलेखक: रोहित गाडगे (लेखक, दिग्दर्शक)
  • कॉपी लिंक

मुळात चित्रपटाची कथा सुचावी, यासाठी स्वतःला वेगळं धरून, बांधून ठेवावं लागत नाही. समाजात घडणाऱ्या, अनुभवास येणाऱ्या घटनांवर नजर असली की लिखाणाला नवी दिशा मिळते. अशाच दृष्टीतून ‘माइंड विदाउट फिअर' या शॉर्टफिल्मची कथा गवसली. स्वातंत्र्याचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन मैत्रिणींची ही कथा आहे. त्या आपल्या रोजच्या जगण्यात, भोवतालात कोणतं स्वातंत्र्य पाहतात? ते त्यांना कसं दिसतं, जाणवतं? त्यांच्या दृष्टीतलं खरं स्वातंत्र्य कसं आहे? हे सारं या लघुपटातून आपल्या भेटीला येतं...

‘माइंड विदाउट फिअर' ही शाळेतील मैत्रिणींची कथा. वडिलांच्या प्रामाणिक असण्याची शिक्षा, दोन मैत्रिणींची ताटातूट अन् त्यांचे भावविश्व या शॉर्टफिल्ममधून दाखवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न केला आहे. श्रुती आणि अंकिता ही या कथेतील दोन पात्रे. श्रुतीच्या कुटुंबात एक घटना घडते. त्याचा तिच्या आयुष्यावर तर परिणाम होतोच, सोबत अंकितालाही अनेक प्रश्न पडतात. आपल्या मैत्रिणीसोबतच असं का झालं, याचा विचार ती करत असते. मनाभोवतीच्या या फेऱ्यातूनच हा लघुपट साकारला. मुळात एखादी कथा सुचण्यासाठी स्वतःला वेगळं धरून, बांधून ठेवावं लागत नाही. समाजात घडणाऱ्या, अनुभवास येणाऱ्या घटनांवर नजर असली की लिखाणाला नवी दिशा मिळते. या लघुपटाच्या कथेबाबतही नेमकं असंच घडलं. आमच्यासमोर, सभोवताली, समाजात असं काही ना काही घडत असतं. लेखक आणि दिग्दर्शकाच्या नजरेचा टिपकागद ते अलगद टिपतो. कोणी कथेच्या माध्यमातून, तर कोणी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर ते आणून ठेवतो. आपण नेहमी म्हणतो, की बालमन हे संस्कारक्षम असतं. या वयात जे पेराल ते उगवतं. कोराल तेच बालमनात घर करून राहतं. पालक आपल्या आयुष्यातील घडामोडींचा मुलावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रयत्न करतात. पण, लहान मुलं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण आणि बोललेल्या प्रत्येक वाक्याचं आकलन करतात. त्यातूनच ती घडत असतात, हेच सांगण्याचा या लघुपटाचा हेतू आहे. शॉर्टफिल्मचं चित्रीकरण आम्ही अमरावतीच्या शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये केलं. ही शाळा अतुल गायगोल आणि अमृता गायगोल या दोन ध्येयवेड्या व्यक्तींनी साकारली आहे. चित्रपटासाठी योग्य त्या विद्यार्थी कलाकारांची निवड केली आणि चार दिवसांत चित्रीकरण पूर्ण केलं. हे काम सुरू होण्याच्या आधी लहान मुलांकडून अभिनय करून घेणं, ही गोष्ट नक्कीच आव्हानात्मक वाटत होती. मात्र, चित्रीकरणादरम्यान मला दोन्ही बालकलाकारांना खूप समजावून सांगण्याची गरजच पडली नाही. एकदा प्रसंग समजावला की, तो पहिल्या किंवा दुसऱ्या टेकमध्येच होऊन जायचा. विशेषतः शेवटचा सीन महत्त्वाचा होता. यामध्ये दोन्ही मुलींचं रडणं मला खूप नैसर्गिक हवं होतं. त्यांनी तो प्रसंग खूप चांगला साकारला आहे. त्यांचं काम पाहून असं वाटलंच नाही, की या मुलींनी आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर काम केलं आहे. छोट्या शहरातील मुलांना नेमकं मार्गदर्शन केलं आणि त्यांना योग्य संधी मिळाली, तर ती नक्कीच राष्ट्रीय पातळीवरील अभिनेत्याच्या तोडीचं काम करू शकतात, हे या लघुपटावरुन लक्षात येतं. ‘माइंड विदाउट फिअर' ही स्वातंत्र्याचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन मैत्रिणींची कथा आहे. त्या आपल्या रोजच्या जगण्यात, भोवतालात कोणतं स्वातंत्र्य पाहतात? ते त्यांना कसं दिसतं, जाणवतं? त्यांच्या दृष्टीतलं खरं स्वातंत्र्य कसं आहे? हे सारं या लघुपटातून आपल्या भेटीला येतं.

‘दिव्य मराठी’चे प्रोत्साहन प्रेरणादायी विशाल रंभापुरे यांनी दर्जेदार चित्रीकरण केलं. रोहन इंगळे यांनी ऑन लोकेशन साउंड तसेच ग्राफिक्सचं काम केलं. सोबतच डॉ. प्रदीप अवचार यांचं निर्मिती सहाय्य लाभलं. ‘टीम टचवूड’चा संपूर्ण चमू आणि शाश्वत कन्सेप्ट स्कूलचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केलं. या सर्वांच्या प्रयत्नातून ही शॉर्टफिल्म तयार झाली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये तिची निवड झाली. ‘दिव्य मराठी’च्या रसिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. हा उपक्रम आणि त्यातून मिळणारे प्रोत्साहन आम्हा दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. संपर्क : ९०९६८०३७९०

बातम्या आणखी आहेत...