आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशातील खरगोनमध्ये कर्फ्यू, राजस्थानच्या करौलीमध्ये भांडण आणि जोधपूरमध्ये सुनियोजित दंगल! का? वास्तवात, मते मिळवण्याचा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे जातींमध्ये भांडण लावणे. कारण दंगली आणि भांडणानंतरच जाती एकत्र येतात. आणि मग एकगठ्ठा मते मिळतात. राजकीय-धार्मिक नेत्यांचे हे सत्य समाजाला समजत नाही, तोपर्यंत भांडणे सुरूच राहणार आहेत. सर्वात मोठी अडचण ही आहे की, ज्या प्रशासनाला किंवा शासनाला राज्य म्हणतात, ज्याचा राजधर्माशिवाय कोणताही धर्म नसतो, ते नेहमीच मध्यम मार्गाने चालते. ते सत्य कधीच समोर आणत नाही, आणू इच्छितही नाही. यामुळे भांडणे होतात.
भांडणे यामुळेही होतात, कारण या घटनास्थळी प्रचंड गर्दी असते, प्रचंड पोलिस बंदोबस्त असतो आणि अशा वेळी एखाद्या पोलिसाला दगड लागतो... शिवाय बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांच्या समानतेच्या गप्पा मारणारे सरकारच सर्व काही नीट करू इच्छित नाही. किंवा राजकारण त्याला तसे करू देत नाही, मग सरकार भाजपचे असो वा काँग्रेसचे!
प्रादेशिक पक्षांबद्दल तर बोलण्यातही अर्थ नाही. संतुलनाच्या नावाखाली तो स्वतः एका पारड्यात उभे राहतात आणि दुसऱ्या पारड्यात साऱ्या जगाला तोलतात.
कधी त्यांच्या भागातून जाताना हे, तर कधी यांच्या भागातून जाताना ते जोरदार घोषणाबाजी करतात, यामुळेही भांडणे होतात. भांडणाचे कारण असे असेल, तर मुख्य मुद्दे कुठे आहेत?... आणि आपल्याला तो मुद्दाच आठवत नसेल तर भांडणे होतातच का, असा प्रश्न पडतो. खरं तर भांडण हिंदूंनाही नको आहे आणि मुस्लिमांनाही. कधी एका बाजूला, कधी दोन्ही बाजूंनी, तर कधी हा वाद मिटवणाऱ्या प्रशासनात चार-सहा जणच असतात.
तेच सर्व काही करतात. दोन्ही समाजांना भोगावे लागते. त्याचा त्रास निष्पाप पीडितांना होतो. जे या बाजूने किंवा त्या बाजूनेही नसतात त्यांना भोगावे लागते. ते मध्येच भरडत राहतात. सहन करत राहतात.
त्यांचे जीवन जणू अपरात्रीची शांतता! त्यांचा आहार जणू गाण्यांच्या गोडव्यातून देशीपणाची साखर काढून टाकणे. त्यांची दिनचर्या जणू तबल्याच्या बोलांतून तिरकिट गायब होणे. त्यांचा आनंद जणू जलतरंगाच्या सुरांतून मधल्या कटोरीतील पाणी सुकून जाणे…! अखेर एखाद्याच्या आयुष्यात एवढी पोकळी निर्माण करून या दंगलखोरांना, या प्रशासनाला आणि या सरकारांना कोणती सुशासन रचना हवी आहे? कोणते सौहार्द पेरायचे आहे? हे सर्व फक्त रामनवमी, ईद या सणांनाच का होते? वर्षभर तर हे समुदाय एकोप्याने राहतात. एकमेकांना भेटतातही. व्यापार-व्यवहारदेखील करतात. मग सणांच्या वेळीच इतका राग, द्वेष कुठून येतो?
अखेर हे सर्व म्हणजे कैरीचं लोणचं तर नाही की ते वर्षभर मुरत राहिल्यावर अचानक कुठल्या तरी सणाला त्यात चव येऊ लागावी! वास्तविक, कोणतेही प्रशासन, शासन किंवा सरकार कोणत्याही समाजाची दिशाभूल करू शकत नाही. त्यांच्याकडे तेवढी ताकद नसते. समाज आणि त्यांचे नेतृत्व कमकुवत असते तेव्हा ते स्वतःला मजबूत बनवण्यासाठी या सगळ्याला बळी पडतात. आणि सामान्य नागरिकाचे काय सांगावे? तो तर दिशाभुलीसाठीच बसला आहे. कुणी काही म्हटले - स्वीकारले! जिकडे म्हटले तिकडे गेले. जिथे म्हणाल तिथे मत टाकून आले. अखेर आपण आपल्या मनाचे का ऐकत नाही? किती दिवस इतरांचे ऐकत राहणार? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर navneet@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.