आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:परमेश्वर हृदयात येताच जागृत होतात पंचतत्त्वे

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईश्वर आयुष्यात आल्यावर काय होते, आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे होते, निसर्ग आपल्यासाठी काय करतो? श्रीराम प्रवेश करणार असताना तुलसीदासजींनी ते दाखवून दिले. ‘अवधपुरी प्रभु आवत जानी। भइ सकल सोभा कै खानी। बहइ सुहावन त्रिबिध समीरा। भइ सरजू अति निर्मल नीरा।।’ परमेश्वराचे आगमन कळताच अयोध्या सौंदर्याची खाण झाली. तिन्ही प्रकारचे (मंद, शीतल, सुवासिक) आल्हाददायक वारे वाहू लागले, शरयू नदीचे पाणी अत्यंत निर्मळ झाले. या गोष्टी आपल्या जीवनालाही लागू होतात.

तुलसीदास प्रसंग कुठे ना कुठे आपणा मानवांशी व निसर्गाशी जोडतात. एखाद्या गोष्टीचा अर्थ समजावून सांगण्यासाठी फायद्याबद्दल बोलणे आवश्यक आहे. तुलसीदासांना माहीत होते की, माणसाच्या फायद्याविषयी बोलले पाहिजे. प्रत्येकाला आनंदी व शांत राहायचे असते, पण तसे जगता येत नाही. म्हणून देवाला आमंत्रण द्या. देव आल्यावर सारे वातावरण आनंदमय होऊन जाते. अयोध्या अशी सुंदर बनणे, तीन प्रकारचे वारे वाहू लागणे, नदीचे पाणी अत्यंत शुद्ध होणे... एकंदरीत ही पंचतत्त्वाची लक्षणे आहेत. पंचतत्त्वे आपल्यातच आहेत. परमेश्वर हृदयात येताच आपल्या शरीरातील पंचतत्त्वे जागृत होतात. देवाला आपल्यामध्ये उतरवण्यासाठी २४ तासांतून एकदा तरी स्वतःशी अवश्य संवाद साधा. योग स्वतःशी जोडण्याचे काम करतो. Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...