आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण अप्रत्यक्षपणे आत्महत्या करत आहोत, हे संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे विधान आहे (कमिटिंग सुसाइड बाय प्रॉक्सी) त्यांचे हे विधान निसर्ग आणि जैवविविधतेवरील गंभीर संकटाच्या संदर्भात कटुसत्य आहे. कॅनडाच्या माँट्रियलमध्ये काल १९ डिसेंबर रोजी जैवविविधतेवर संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन (सीओपी १५) झाले. यात जगभरातील सर्व देश २०३०पर्यंत जैवविविधतेला होणारे नुकसान थंाबवण्यासाठी एकत्र आले आणि माँट्रियल ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्कवर सहमती दर्शवली. २०२० नंतर जागतिक जैवविविधता फ्रेमवर्क (जीबीएफ) स्वीकारून निसर्गाला होणारे नुकसान २०३० पर्यंत थांबवण्याचे ठरवण्यात आले. जगभरातील पुढील दशकासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ब्ल्यूप्रिंट सादर केली जाईल. यात ३०% भौगोलिक आणि ३०% सागरी जैवविविधतेचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शिवाय २०३० पर्यंत दरवर्षी श्रीमंत विकसित देश विकसनशील देशांना मदत करण्यासाठी ३० अब्ज डॉलर निधी देतील. मात्र, या कराराविषयी अनेक मतभेद अजूनही आहेत. यात जैवविविधतेतील अार्थिक अंतर (फायनान्शियल गॅप), स्थानिक लाेकांच्या अधिकारांचे संरक्षण, डिजिटल सिक्वेन्स इन्फर्मेशन (डीएसआय) पर्यंत पोहोचणे आणि यापासून होणाऱ्या फायद्याची वाटणी यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. दुसरीकडे ब्राझील, रशिया, चीनने ध्येयाचे समर्थन केले नाही.
शास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला की, जैवविविधतेचे नुकसान असेच सुरू राहिले तरे भविष्यात दरवर्षी ३३ लाख लोक प्राण्यांना होणाऱ्या आजारापासून मरतील. आशियातील पाण्याचे मनोरे म्हटल्या जाणाऱ्या हिमालयातील हिमनद्यांवर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत आहे. शास्त्रज्ञांनी उपग्रह डेटाच्या आधारे लडाखच्या द्रास प्रदेशातील ७७ हिमनद्यांचे मूल्यांकन केले आणि २००० ते २०२० दरम्यान या सर्व हिमनद्या सरासरी १.२७ मीटर पातळ झाल्याचे आढळले. जगातील सर्वात मोठी भिंत (ग्रेट बॅरियर रीफ म्हटले जाते) साठी संयुक्त राष्ट्र अभियानने निष्कर्ष काढला की, जगातील धोक्यात असलेल्या वारसा यादीत ठेवले पाहिजे. समुद्राच्या आम्लीकरणामुळे त्यांचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भारतापासून ते बांगलादेशपर्यंत पसरलेले जगातील एकमेव मोठे मँग्रोव्ह जंगल म्हणजेच सुंदरबन समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नष्ट होत चालले अाहे. जगातील दहा लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. १९७० ते २०१८ दरम्यान जगभरातील वन्यजीवांची संख्या सरासरी ६९ टक्क्यांनी घटली. मानवी वापरामुळे निसर्ग विलुप्त होण्याच्या चक्राची प्रक्रिया हजाराहून अधिक वेळा वाढली आहे. २०२०च्या एका अभ्यासात कळले की, जगाने १५० वर्षांत सर्वच कीटकांच्या पाच ते १० टक्के प्रजाती म्हणजेच सुमारे अडीच ते पाच लाख प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. जागतिक तापमानात वाढ आधीच्या औद्योगिक पातळीपेक्षा १.५ डिग्री सेल्सियसपर्यंत मर्यादित करणारे बहुतांश आयपीसीसी परिदृश्य वन संरक्षण अाणि वनीकरणाशिवाय शक्य होणार नाही. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत)
डॉ. सीमा जावेद, पर्यावरणतज्ज्ञ seema.javed@gsccnetwork.org
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.