आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:जगाला विचारांचे हे सामर्थ्य कोणत्या किमतीवर मिळाले?

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विचार व तंत्रज्ञान हे विकास आणि बदलाचे इंजिन व इंधन आहेत. विचारांच्या गर्भातून निर्माण झालेले बिहार आंदोलन (१९७४) ५० व्या वर्षात आहे. विचारांनी इतिहासात दारूगोळ्यासारखे काम केले. महासुनामीच्या प्रचंड वेगाने. फ्रेंच राज्यक्रांती (१७८९), रशियन क्रांती (१९१७), चीन (१९११), व्हिएतनाम (१९३०) इ.च्या ज्वालांमध्ये जग होरपळले. गांधीजींच्या विचार-वादळाने साम्राज्यवाद संपवला. विचारांच्या ताकदीचे ते सर्वोत्तम क्षण होते. जगाला हे क्षण कोणत्या किमतीवर मिळाले? विचारवंत अरुण भोळे यांच्या शब्दांत (‘राजनीती मेरी प्रेयसी’, १९८३) ‘किती सॉक्रेटिसांना विष प्यावे लागले, किती येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर चढावे लागले, किती मन्सूरांचे विच्छेदन झाले, किती ब्रुनोंना जिवंत जळावे लागले, किती गॅलिलिओ आंधळे झाले, किती रुसो दुखी झाले, किती मार्क्स भटकत राहिले...’ मे १७८९ (फ्रेंच क्रांती) पासून सुमारे २२५ वर्षे विचारप्रेरित चळवळींनी मानवतेला मुक्तीच्या उंबरठ्यावर आणलेले दिसते. फक्त दार उघडले की, समोर स्वर्ग आहे. बिहार विद्यार्थी आंदोलन ही या प्रवाहातून निर्माण झालेली परिवर्तनाची शेवटची सार्वजनिक चळवळ होती. यानंतर टेक-प्रेरित-संचालित ‘अरब स्प्रिंग मूव्हमेंट’ (२०११) चा अस्थायी टप्पा दिसला. जेपी हे बिहार चळवळीचे प्रमुख सारथी होते. त्यांनी त्याला संपूर्ण क्रांती (५ जून १९७४) असे संबोधले. ते म्हणाले, हे मन-परिवर्तनाचे काम आहे. त्यांनी तुरुंगातून देशवासीयांना उद्देशून लिहिले (१९७५)- ‘ही चळवळ केवळ शासन बदलण्यासाठी नाही, तर समाज व व्यक्ती बदलण्यासाठी आहे.’ पण आता जग तंत्रज्ञान क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात आहे. गेल्या आठवड्यात हजारो तज्ज्ञ आणि टेक-नायकांनी ओपन एआय आणि इतर कंपन्यांना ‘चॅटजीपीटी’सारख्या प्रणालींवर त्यांचे काम थांबवण्याचे आवाहन केले. कारण, ‘त्यामुळे समाज आणि मानवतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे,’ असा अहवाल द न्यूयॉर्क टाइम्सचा प्रतिनिधी देतो. सॅम ऑल्टमनशी पहिली भेट २०१९ मध्ये झाली. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने सॅमच्या तीन वर्षांपूर्वीच्या स्टार्टअपमध्ये (ओपन एआय) एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली होती. ऑल्टमनने आपल्या कंपनीची तुलना मॅनहॅटन प्रकल्पाशी केली (१९३९, अणुबॉम्बचा शोध अमेरिकेत लागला). ते म्हणाले, या तंत्रज्ञानामुळे जगाला कोणी पाहिली नसेल अशी समृद्धी मिळेल, पण त्यामुळे मोठा समस्याही निर्माण होईल. चुकीचा प्राचर आणि माहिती पसरवली जाईल. पारंपरिक नोकऱ्या नष्ट होतील. माणसाला त्याच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावण्याची ताकद त्यात आहे. बातमीदार सांगतो की, २०१९ मध्ये या गोष्टी मला विज्ञानकथा वाटल्या. समाजशास्त्रज्ञ डॅनियल (१९६०) यांनी ‘द एंड ऑफ आयडिआॅलॉजी’ हे पुस्तक लिहिले. ते म्हणाले, राजकीय विचारसरणीचे युग संपले आहे. भविष्यातील राजकारणाचा नवा फोकस ‘तुकड्या-तुकड्यांनी होत असलेले तांत्रिक बदल’ असेल. मग विचारवंत फुकुयामा (‘द एंड ऑफ हिस्ट्री अँड द लास्ट मॅन’ - १९९२) यांची चर्चा जगभर गाजली. ‘वैचारिक विस्तार संपुष्टात आला आहे.’ तोपर्यंत जग ग्लोबल व्हिलेज झाले होते. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या काळात होते. या दशकात एआय धक्कादायकपणे जग बदलून टाकेल, असे तज्ज्ञांनी जाहीर केले. विचारसंपन्न नवीन पुस्तक ग्रॅज्युअल (ग्रेग बर्मन, आॅब्रे फाॅक्स) एक वेगळा निष्कर्ष काढते. क्रमिक विकास ही टेलिव्हिजनवरील ब्रेकिंग न्यूज नाही. तो हळूहळू होतो. हे पुस्तक सांगते, क्रांतिकारकांकडे आकर्षक घोषणा असतात. अशा घोषणांनी स्वर्ग दाखवला. पण रक्ताच्या नद्या आणि हुकूमशाही दिली. विचार आणि तंत्रज्ञान यांच्यातील ससा व कासवासारखी ही शर्यत आहे. मॅनहॅटन प्रकल्पाचे प्रभारी शास्त्रज्ञ ओपेनहाइमर यांनी अणुस्फोट पाहिला तेव्हा त्यांनी गीतेतील ओळ उच्चारली, ‘मी मृत्यू झालो आहे, संहारक.’ नवे मॅनहॅटन हाताळण्याची बुद्धी आपल्याकडे आहे का, हा आज जगासमोर प्रश्न आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

हरिवंश राज्यसभेचे उपसभापती rsharivansh@gmail.com