आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुमारे बारा वर्षांपूर्वी मी आफ्रो-दलित सिद्धांताचा प्रतिकार केला होता, जेव्हा तो आपल्या सुरुवातीच्या काळात होता. या सिद्धांतानुसार, दलित भारताचे कृष्णवर्णीय (ब्लॅक) आहेत आणि बिगर-दलित श्वेतवर्णीय (व्हाइट) आहेत. हे गृहीत धरून भारतीय समाजातील जातिव्यवस्था ही वर्णद्वेषाच्या बरोबरीची आहे, असा सिद्धांताचा दावा आहे. माझे पुस्तक ‘ब्रेकिंग इंडिया’ मध्ये मी अमेरिकेतून संचालित आणि आर्थिक मदतीच्या आफ्रो-दलित प्रकल्पाची कार्यपद्धती स्पष्ट केली होती. हा प्रकल्प अमेरिकन वर्णद्वेषाच्या सिद्धांताचा वापर करून भारतातील सामाजिक मतभेदांना भडकवून आपल्या देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे.
यावर भारतीयांनी प्रतिक्रिया द्यायला हवी की, दडपशाहीचा इतिहास प्रत्यक्षात आणखी एका निष्कर्षाकडे लक्ष वेधतो. ज्याप्रकारे अमेरिकेतील श्वेतवर्णीयांनी कृष्णवर्णीयांचे शोषण केले, त्याचप्रमाणे भारतातील हिंदूंचेही वसाहतवादातून परकीय आक्रमक आणि युरोपीय लोकांकडून शोषण झाले. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना हिंदू संस्कृती आणि इतिहास समजावून सांगण्यासाठी हिंदूंनी पुढाकार घ्यायला हवा होता. इसाबेल विल्करसन एक प्रमुख कृष्णवर्णीय विद्वान आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक पुस्तक लिहिले, त्यात आफ्रो-दलित समाजाला जगातील शोषित वर्गाचे केंद्र म्हणून चित्रित केले. ‘कास्ट : दि ओरिजिन्स ऑफ अवर डिस्कंटेंट्स’ शीर्षक असलेल्या या पुस्तकात, अनेक प्रकारच्या जातीयवादात जात फक्त एक प्रकार नव्हे तर (भारतीय जातिव्यवस्थेच्या अर्थाने) जात हा कणा आहे, ज्यावर वंशवादाचा संपूर्ण सिद्धांत उभा असल्याचे म्हटले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, जात ही संकल्पना इंग्रजांनी वैदिक ग्रंथातून शिकून अमेरिकेत नेली आणि नंतर त्या आधारावर त्यांनी अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या विरोधात वर्णद्वेषाची व्यवस्था निर्माण केली. नंतर ही व्यवस्था युराेपातही पसरली. त्याचा परिणाम म्हणून नाझींनी होलोकॉस्ट केले. अशा प्रकारे विल्करसन यांनी दावा केलाय की, भारतातील जातिव्यवस्था ही जगातील वर्णद्वेषाचे मूळ कारण आहे. त्यांनी युक्तिवाद केलाय की, कर्माच्या तत्त्वामुळे जातीचा हिंदू धर्माशी अतूट संबंध आहे. मला भारतातील दलित आणि अमेरिकेतील कृष्णवर्णींयाविषयी सहानुभूती आहे. मात्र अमेरिकन इतिहासाच्या चष्म्याचा वापर करून दलित समस्यांकडे पाहण्याचा विल्करसन यांचा प्रयत्न खटकतो आहे. भारतीय सामाजिक व्यवस्थेचा इतिहास खूपच कठीण आहे आणि तो एकांगी विश्लेषणातून समजावून सांगणे शक्य नाही. या तत्त्वाची मर्यादा फक्त शैक्षणिक संस्थेपुरती असते चांगले असते. मात्र विल्करसन यांच्या तत्त्वाला अमेरिकी सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. विल्करसन हे पुलित्झर पारितोषिक विजेते आहेत. त्यांचे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत प्रथम क्रमांकावर आहे. ओप्रा विन्फ्रे यांनी त्यांच्या पुस्तकाचा प्रचार केला आहे. हे तत्त्व आता ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ आणि न्यू व्हॉइस सोशल जस्टिस विचारसरणीचा केंद्र बनले आहे. याला एका स्वतंत्र अभिव्यक्ती किंवा विचार मानता आले असते, मात्र दलितांशी कृष्णवर्णीय आणि ब्राह्मणांची श्वेतवर्णीयांची तुलना वाद-योग्य गृहीतक म्हणून सादर करायला हवे होते. मात्र याला निर्विवाद सत्य म्हणून मांडले जात आहे. परिणामी, सामाजिक न्यायाच्या चळवळीचे रूपांतर हिंदूंच्या द्वेषाच्या चळवळीत झाले आहे. जागतिक दडपशाहीचा उगम म्हणून भारताचे चित्रण केले जात आहे. या विचारसरणीचा प्रतिकार करणे आवश्यक आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)
राजीव मल्होत्रा लेखक आणि विचारवंत rajivmalhotra2007@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.