आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:लसींच्या महागोंधळात बीसीजी लस दुर्लक्षित

अतुल माने2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीसीजी ही लस कोरोना वर मात करण्यासाठी सक्षम आहे का? यावर अनेक मतमतांतरे असली तरी एका संशोधनाद्वारे ज्या देशात बीसीजी लस कार्यक्रम बंद करण्यात आला आहे तेथे कोरोनाचा सर्वात मोठा प्रादुर्भाव झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिकेसह सर्वच देशांनी बीसीजी लसीकरण मोहिम गेल्या अनेक वर्षांपासून बंद केलेली आहे. या सर्वच देशात सध्या कोरोनाचे थेमान सुरू आहे. भारतात ही लस अजूनही देण्यात येत असल्याने लहान मुले ते ४० ते ४५ वयोगटातील कोरोना रुग्णाचे आणि मृत्यूचे प्रमाण हे अन्य देशातील आकडेवारी पेक्षा खूपच कमी आहे.

जगभरात कोरोना चे अक्षरशः हाहाकार सुरू असताना १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये त्याचा फार मोठा प्रभाव पडला नसल्याचे सध्या तरी दिसत असले तरी यामागे आपल्याकडे अद्यापही सुरू असलेल्या बीसीजी लसीचा परिणाम याला कारणीभूत ठरला असावा असा निष्कर्ष काही संशोधक आणि तद्यांनी व्यक्त केला आहे.

बीसीजी म्हणजे बेसलीस कॅल्मेट गुरीन. आपल्याकडे अजूनही नवजात बाळाला बीसीजी लस दिलीच जाते. खरे तर ही लस क्षयरोग नियंत्रणासाठी विकसित केलेली असली तरी ती मूत्रपिंड, कर्करोग आणि हाडांचा संसर्गजन्य रोग, श्वसन यासाठी खूपच प्रभावी आहे. १८८२ मध्ये रॉबर्ट कौख यांनी क्षयरोग जिवाणूंचा शोध लावला. तर १९०० पासून काल्मेट आणि कॅमिल गारेन यांनी या लसीच्या संशोधनाला सुरुवात केली. त्यासाठी फ्रान्स येथील एका प्रयोगशाळेत एम बोविहस या प्राण्यातील क्षयरोग कारक जीवाणूचे क्षिणन करून ही लस तयार करण्यात आली. या लसीचा प्रवास मोठा रंजक आहे. पॅरिस येथील चॅरिटी हॉस्पिटलमध्ये क्षयरोगाने दगावलेल्या मातेच्या नवजात बाळाला सर्वप्रथम ही लस मुखावाटे पाजली. आणि त्याचा योग्य परिणाम दिसून आला. ही लस १९२५ पर्यन्त मुखावाटे देण्यात येत होती. नंतर १९२७ पासून ती अंतस्वत्वचेत देण्यात येऊ लागली. क्षयरोग प्रतिबंधक सुरक्षित लस म्हणून या लसीला जगभर मान्यता देण्यात आली. तर त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने डायनिष १३३१ या वंश साखळीतील जीवाणूंना लस निर्मितीसाठी मान्यता दिली. आजही कोपनहेगन येथील आंतरराष्ट्रीय संदर्भ केंद्रात या लसीचा नियमित आढावा घेण्यात येतो.

ही लस द्रवरूपात असून बाळाच्या जन्मानंतर ती लगेचच देण्यात येते. केवळ भारत आणि जगातील अन्य छोटी राष्ट्र यामध्ये ही लस आजही देण्यात येते. तर अमेरिकेसह युरोप मधील सर्वच देशांनी या लसीचा वापर करणे बंद केले आहे हे येथे आवर्जून नमूद करणे गरजेचे आहे.ही लस आपल्या देशात सार्वत्रिक आहे. तर विकसित म्हणजे क्षयरोग फारसा आढळत नसलेल्या देशात ती जोखीम गटातील व्यक्तींना अभावाने देण्यात येते. लस घेतल्यानंतर दोन ते तीन आठवड्यात लस टोचलेली जागा असते तेथे एक फोड येतो. त्याचा आकार वाढत जाऊन साधारण पाच आठवड्यात तो मोठा होऊन फुटतो आणि त्याठिकाणी एक व्रण तयार होतो. आपणा सर्वाच्या दंडावर तो व्रण आहे. आता शास्त्रीय दृष्टीने या लसीकडे पाहिले तर ही लस केवळ क्षयरोग पासून संरक्षण देते असे नसून शरीरात प्रतिकारशक्ती म्हणजे अँटी बॉडीस तयार करते. ज्यामुळे त्याचा प्रभाव कर्करोग आणि अन्य आजारावर परिणामकारक होतो.

आता बीसीजी ही लस कोरोना वर मात करण्यासाठी सक्षम आहे का? यावर अनेक मतमतांतरे असली तरी एका संशोधनाद्वारे ज्या देशात बीसीजी लस कार्यक्रम बंद करण्यात आला आहे तेथे कोरोनाचा सर्वात मोठा प्रादुर्भाव झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिकेसह सर्वच देशांनी बीसीजी लसीकरण मोहिम गेल्या अनेक वर्षांपासून बंद केलेली आहे. या सर्वच देशात सध्या कोरोनाचे थेमान सुरू आहे. भारतात ही लस अजूनही देण्यात येत असल्याने लहान मुले ते ४० ते ४५ वयोगटातील कोरोना रुग्णाचे आणि मृत्यूचे प्रमाण हे अन्य देशातील आकडेवारी पेक्षा खूपच कमी आहे. बीसीजी लस किमान २५ ते ३० वर्ष प्रभावी ठरते असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्याचा आधार घेतला तर भारतात ५० ते पुढील गटातील लोकांनाच कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे स्पष्ट होते. याबाबत जर कोविड १९ च्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल अथवा अडचण येत असेल तर त्यावर बीसीजीची लस वापर करता येतो असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यासाठी हाफकीन संशोधन संस्था आणि पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या संशोधकाच्या एका गटाने नोव्हेंबर महिन्यात याबाबत संशोधन केले होते. यावेळी त्यांना असे दिसून आले की क्षयरोगावर वापरण्यात येणारी बीसीजी ही लस कोरोना रुग्णास दिली असता त्याची श्वसनाची अडचण दूर होते. हे सिद्ध करण्यासाठी या संशोधक गटाने सुमारे ६० कोरोना रुग्णांना बीसीजी ही लस दिली होती. त्यापैकी अर्ध्याहून अधिक रुग्णांची श्वसनाची समस्या तीन ते चार दिवसात कमी झाली. विशेष म्हणजे या ६० रुग्णांमध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. तर दुसरीकडे ज्यांना बीसीजी लस देण्यात आली नव्हती अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या संशोधक गटाने आपल्या निष्कर्ष अहवालात असे नमूद केले आहे की ज्यांना बीसीजी लस देण्यात आली त्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढली आहे. पण या शोधनाची इतर तज्ञांनी अद्यापही खातरजमा केली नाही.

याबाबत हाफकीन संशोधन संस्थेच्या डॉ उषा पद्मनाभन यांनी सांगितले की, आम्ही केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की ज्या रुग्णाला आधी श्वसनाचा त्रास होता त्याचा हा त्रास बीसीजी लस घेतल्यानंतर तीन ते चार दिवसात कमी झाला. आणि विशेष म्हणजे न्यूमोनिया सुद्धा जलदगतीने बरा झाला. त्या बरोबर रुग्णाच्या प्रतिकारशक्ती मध्ये झपाट्याने वाढ झाली. असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या की, ही लस नेमकी कशी काम करते आणि त्याचा परिणाम काय होतो यावर खरच संशोधन होणे गरजेचे आहे. ज्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण हे ९३ टक्क्यांहून कमी झाले होते आणि नंतर त्यांना न्यूमोनिया झाला होता अशा ६० रुग्णांना बीसीजी लस देऊन अभ्यास करण्यात आल्याचे डॉ पद्मनाभन म्हणाल्या.

याबाबत बीजे मेडिकलच्या समीर जोशी यांनीही सांगितले की, ज्या रुग्णांना ही लस देण्यात आली होती त्यांना त्याचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत. विशेष म्हणजे लस देण्यात आलेले रुग्ण हे सात दिवसांनंतर घरी गेले. दरम्यान यावर बोलताना काही वैद्यक तद्यांनी बीसीजी लस किती परिणाम कारक ठरते यासाठी आणखी मोठ्या लोकसंख्येवर ही लस देण्यात येऊन त्याची चाचणी करावी असे मत व्यक्त केले आहे .

चेन्नई येथील राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेतील एक अभ्यास गट आणि आयसीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या संशोधनात निघालेल्या निष्कर्षचा अहवाल हे सांगतो की क्षयरोगावर उपयुक्त असलेली बीसीजी ही लस वापरली तर वयोवृध्द लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते. या लसीमुळे शरीरात अनुकूल रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नव्या सेल्स निर्माण होऊन त्यात अँटी बॉडीज ची निर्मिती होते. याबाबत "आयसीएमआर' चे रंजन गंगाखेडकर यांचे म्हणणे असे आहे की, बीसीजी ची लस कोरोनावर बिनतोड उपाय आहे हे अद्याप सिद्ध झाले नाही. बीसीजी लस आपल्याकडे जन्मताच दिली जात असल्याने जगात इतर देशाच्या तुलनेने कोरोना मृत्यूचे प्रमाण भारतात कमी आहे असा दावा सध्या करण्यात येत असला तरी तो अद्याप सिद्ध झाला नसल्याचे आयसीएमआर चे म्हणणे आहे.

सध्या सुरू असलेल्या सिरम आणि भारत बायोटेक यांच्या कोव्हीशिल्ड आणि कोव्हाक्सिन या दोन लशींवरून विविध मतप्रवाह व्यक्त करण्यात येत आहेत. या लशींची चाचणी आणि त्याचा अहवाल तसेच त्याचा होणारा परिणाम आणि दुष्परिणाम याबाबत कोणालाही खात्री नाही. खुद्द डॉक्टर सुद्धा याबाबत साशंक आहेत. केंद्र सरकारने लस ही ऐच्छिक असल्याचे सांगितले असले तरी लस घेताना मात्र कोणत्या कंपनीची घ्यावी याबाबत नागरिकांना अधिकार नाही. तसेच लस घेताना तुम्हाला स्वेच्छा निवेदनावर स्वाक्षरी करून मान्यता द्यावी लागणार आहे. त्यानुसार ही लस घेतल्यावर त्याचे काहीही दुष्परिणाम झाल्यास संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यासाठी शासन अथवा लस निर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही. खरे तर मोठ्या शस्त्रक्रिये प्रसंगी असा फॉर्म भरून घेतला जातो. यापूर्वी कोणत्याही लस देण्याच्या उपक्रमात असे फॉर्म भरून घेण्यात आले नाहीत. लस निर्मिती आणि त्याचे दर यामध्ये मोठा आंतरराष्ट्रीय अर्थकारणांचा बाजार असू शकतो. घाईघाईत आणलेल्या या लशींची कोणीही ठामपणे खात्री देऊ शकत नाही.

खरे तर मुंबईत परळ येथे असलेली हाफकीन ही शासनाची सर्वात जुनी आणि प्रसिद्ध संशोधन संस्था आहे. हाफकीन इन्स्टिट्यूट अथवा हाफकीन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था ही भारतातील जीवाणू विज्ञानात संशोधन करणारी एक मुख्य संस्था आहे. प्लेग रिसर्च लॅबोरेटरी या नावाने डॉ वालदेमार हाफकीन यांनी १० ऑगस्ट १८९९ रोजी जीवाणू विज्ञान विषयक संशोधन केंद्राच्या रुपात या संस्थेची स्थापना केली. ही संस्था आता जेव वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात काम करते. या संस्थेत इतर आरोग्य संबंधित उत्पादनासाठी विशेष चाचणी अहवाल, आणि प्रकल्प हाती घेते. पाय आणि तोंडाच्या रोगाच्या लसीच्या सुधारणा करणे, आणि सूक्ष्मजीव विज्ञानीय विश्लेषण , एड्सच्या रुग्णामध्ये होणाऱ्या संसर्गाचा अभ्यास आणि सूक्ष्म जंतूंचा मुकाबला करण्यासाठी नवीन केमोथेरपी विकसित करणे आदी प्रमुख संशोधन केले जाते. पण सध्या दुर्देवाने हाफकीन चे महत्व कमी करून संशोधन करण्याचे काम खासगी औषध कंपन्यांना देण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून हाफकीनची अवस्था बिकट होत चालली आहे. त्यांच्या संशोधनाचे स्वामित्व आता खासगी मोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना देण्याचा घाट घातला जातोय. भविष्यात ही जगमान्य संस्था बंद पडल्यास आश्चर्य वाटू नये.

हाफकीन आणि बीजे मेडिकल तसेच चेन्नई मधील क्षयरोग विषाणू अभ्यास संस्था व आयसीएमआर यांनी केलेल्या संशोधनाचा विचार केला तर बीसीजी लस ही कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याबाबत जगभरातील काही तद्यांनीसुद्धा या लसीबाबत नव्याने संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे जगभरातील वाटचाल आणि त्याचा तुलनेने भारतावर पडलेला प्रभाव याचे इंगित या बीसीजी लसी मध्ये असू शकते. पण त्यासाठी इच्छाशक्ती हवी ती या संशोधनाला चालना देण्याची. अन्यथा अर्थकारणाच्या या बाजारात नवनवीन लसीचे दुकान बिनघोर पणे सुरूच राहील आणि लोकांचा जीव मात्र कायमच टांगणीला राहील हेच खरे..

atulm2001@gmail.com

बातम्या आणखी आहेत...