आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहारभान:रात्री उशिरा जेवणे टाळा...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी-व्यवसायामुळे अनेकांच्या जेवणाच्या वेळा अनियमित असतात. मात्र, रात्री आठ वाजल्यानंतर जेवल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे किमान रात्रीचे जेवण तरी प्रत्येकाने वेळेवर करणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात रात्री उशिरा जेवण्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल...

१) अपचन- रात्री उशिरा जेवण केल्यामुळे सगळ्यात आधी भेडसावते ती अपचनाची समस्या. जेवण आणि झोपेत फार अंतर न ठेवल्यास पचनाशी निगडित समस्याही डोके वर काढू शकतात. २) अनियंत्रित रक्तदाब - उशिरा जेवणामुळे रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढण्यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. ३) आळसल्यासारखे वाटणे - रात्री उशिरा जेवण केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही. झोप अपूर्ण झाल्याची भावना, त्यासोबतच बद्धकोष्ठता, डोकेदुखी, शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखे दिवसभर जाणवते. ४) वजन वाढणे - रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढते. अनेकांना डाएट करून, नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. ५) अपूर्ण झोप - रात्री उशिरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर परिणाम होऊन, झोपल्यानंतर अस्वस्थ वाटते. त्यामुळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.

डॉ. अमित भोरकर

बातम्या आणखी आहेत...