आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणी भक्त झाला तर तो परंपरावादी विचार मानू नये. भक्ती केली तर वर्तमानातून मागे जाईल, त्याचा विकास थांबेल, भौतिक जगात त्याला नाकारले जाईल, असा गैरसमज अजूनही आहे.. हे तंत्रज्ञानाचे युग आहे. या कालखंडातील यशांमध्ये धोकेही समोर आले आहेत. हॅकिंग हा मोठा धोका असल्याचे मानले जात आहे. कॅशलेस इकॉनॉमी, पेपरलेस ऑफिस... यात धोका आहे. कधी आणि कोणाचा डेटा चोरीला जाईल हे सांगता येत नाही. आता याकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहा. दुर्गुण आपल्या जाणिवेची हॅकिंग करतात. आज संरक्षण क्षेत्रातील आकडेवारी सुरक्षित नाही, मग सर्वसामान्यांच्या आकडेवारीबद्दल काय म्हणावे? तंत्रज्ञानाच्या जगात चोराला अंधाराची गरज नाही. डाकूला वेशही बदलावा लागत नाही. उचलेगिरी करणाऱ्याला निर्जनतेची वाट पाहावी लागत नाही. आता पेगाससही जुने झाले आहे. म्हणूनच बाकी यंत्रणा सरकार जाणे, पण भक्त हॅकिंगमुक्त अवस्थेत जगू शकतो. भक्ती जितकी प्रबळ असेल तितके तुम्ही दुर्गुणांच्या हॅकिंगपासून सुरक्षित राहाल.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com }Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.