आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:काम टाळल्याने काहीही फायदा होणार नाही

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन म्हणजे करिअर नाही
तरुणांनी कठोर मेहनत करावी, पण कशासाठी? तुम्ही तुमचे जीवन ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम करता का? कारण आयुष्य हे फक्त करिअर नाही. यामध्ये आरोग्य आणि नातेसंबंधसुद्धा समाविष्ट आहेत. तुम्ही भरपूर झोपाल, व्यायाम कराल आणि पौष्टिक आहार घ्याल तरच आरोग्य टिकेल. नातेसंबंध म्हणजे मित्र, कुटुंब, महत्त्वाच्या लोकांसोबत वेळ घालवणे.

क्वाइट क्विटिंगने येथील अनेक काम करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचा अर्थ नोकरीत कमीत कमी काम करणे, आवश्यकतेपेक्षा कमी प्रयत्न करणे आणि अपेक्षित आहे तेवढेच करणे. पाच वाजता लॅपटॉप बंद करून त्यापासून मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अलिप्त होऊन ऑफिसमधून बाहेर पडणे - सॉरी बॉस, माझे काम झाले. तर, तरुणांनी कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ नये, यासाठी प्रवृत्त केले जात आहे, अशा टप्प्यावर आता आपला समाज आला आहे. शेवटी, नोकरी व जीवन यातील समतोल बिघडवून आणि त्या बदल्यात फारसे काही मिळत नसताना आपले आरोग्य धोक्यात घालून काय उपयोग? आपल्याला पगाराची नक्कीच गरज आहे, त्यासाठी नोकरीची आवश्यकता आहे, पण त्यासाठी कठोर परिश्रम का करावी?

तथापि, तात्त्विकदृष्ट्या वरील युक्तिवादांमध्ये काही सत्यता आहे. परंतु, क्वाइट क्विटिंग व्यावहारिक नाही. एखादा तरुण क्वाइट-क्विटिंग करत असेल तर त्याचे वरिष्ठ त्याला/तिला सरासरी क्षमतेचे, प्रेरणाशून्य आणि निष्क्रिय समजतील. ही त्याच्यासाठी चांगली गोष्ट ठरणार नाही. क्विटिंग करत असाल तर ते वरिष्ठांना कळते, ते त्या आधारावर तुमच्याबद्दल मत बनवतात आणि ते तुमच्या करिअरसाठी हानिकारक ठरू शकते. परंतु, आपण क्वाइट क्विटिंगवर पुढे जाण्यापूर्वी आणखी एक पैलूदेखील विचारात घेणे रंजक ठरेल. एका कंपनीचे संस्थापक आणि सीईओंंनी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहून तरुणांना क्वाइट क्विटिंगच्या उलट कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. त्यांची पोस्ट अशी : ‘तुम्ही २२ वर्षांचे असाल आणि नवी नोकरी असेल, तर स्वतःला कामात झोकून द्या. चांगले खा आणि तंदुरुस्त राहा, परंतु किमान ४-५ वर्षे दिवसाचे १८ तास काम करण्यास तयार राहा. नोकरी-जीवनाचा समतोल साधला पाहिजे, कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे, ताजेतवाने होऊनच कामावर परतले पाहिजे, असे वाटणाऱ्या अनेक तरुणांना मी पाहतो. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नाहीत असे नाही. ते महत्त्वाचे आहेच, परंतु करिअरच्या सुरुवातीला नाही. सुरुवातीला कामालाच पूजा मानावे, मग ते काहीही असो. कारकीर्दीच्या पहिल्या पाच वर्षांत आपण जी स्थिती निर्माण करतो ती आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे उगाच रडगाणे गाऊ नका. सक्षमता दाखवा आणि कामाला लागा.’

व्वा, दिवसाचे १८ तास काम! मग आज व्यवसाय-मालक कर्मचाऱ्यांकडून हीच अपेक्षा करतात का? म्हणजे एकीकडे किमान कामाचा पुरस्कार करणारे क्वाइट क्विटर्स आहेत, तर दुसरीकडे दिवसाला १८ तास कामाची मागणी करणारे आणि उगाच रडगाण्याला आक्षेप घेणारेही आहेत. मग योग्य धोरण काय असेल? अशा परिस्थितीत एक सामान्य काम करणारी व्यक्ती काय करेल? जीवनात अनेकदा घडते तसे इथेही दोन्ही टोकाच्या गोष्टी चुकीच्या आहेत. वरील उत्साही सीईओ म्हणतात, चांगले खा आणि तंदुरुस्त राहा, पण १८ तास काम करा. सर, दिवसात २४ तास असतात, त्यापैकी १८ तास कोणी काम केले तर उरलेल्या ६ तासांत तो चांगले खाऊन निरोगी कसा राहणार? मग घरातील कामे आणि नातेसंबंध तर दूरच. मग कर्मचाऱ्याने किती तास झोपावे? २ तास? आपण कितीही मेहनती असलो तरी तंदुरुस्ती, झोप, जेवण आणि नातेसंबंधांवर घालवलेला वेळ मोजल्यास आपल्याकडे दिवसाचे सरासरी १०-१२ तास राहतील. पण, एकाग्रतेने काम केले तर तेवढेही पुरेसे आहे. माणसाला दिवसाचे १८ तास काम करण्याची गरजही नाही. किंबहुना सहा ते आठ तास लक्ष केंद्रित करून काम करणे अनेकांना अवघड असते. म्हणून निश्चितपणे कठोर परिश्रम करा, परंतु केवळ मानवी शरीर आणि मनाच्या क्षमतेमध्ये. तसेच, लक्षात ठेवा की, क्वाइट-क्विटिंगसारख्या गोष्टी दीर्घकाळ उपयोगी पडणार नाहीत. याचा विचार करत असाल तर एक तर तुम्हाला तुमची नोकरी आवडत नाही किंवा तुम्हाला कामाचे वातावरण आरामदायक वाटत नसावे, अशी शक्यता आहे.

मग समस्येवर चांगला उपाय म्हणजे क्वाइट क्विटऐवजी क्वाइट वर्क हा असेल. क्वाइट वर्क म्हणजे आपले करिअर आणि जीवनाचा विकास करण्यासाठी आपण करतो ते काम. यामध्ये नवीन नोकरी शोधणे, नेटवर्किंग करणे, इतरत्र जाऊन अभ्यास करणे, व्यवसाय योजना तयार करणे आणि तुमच्या सध्याच्या कामाच्या त्रासातून बाहेर काढू शकेल अशा प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे. क्वाइट वर्क म्हणजे आपली परिस्थिती बदलण्यासाठी इतके शांतपणे काम करणे की, आपल्या आजूबाजूच्या कोणाच्या ते लक्षातही येणार नाही. कारण आपली सध्याची नोकरी आपल्याला आवडत नसली तरीही आपण ती चांगली करत असतो. आतल्या आत आपल्याला हे काही काळासाठी असल्याचे माहीत असते. आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आपण शांतपणे काम करतो. अनेकदा आपण आपल्या आयुष्यातील अशा प्रसंगांचे बंदी बनतो, जे आपल्याला आवडत नाहीत. त्यांच्यातून बाहेर येण्यासाठी काम करत राहून त्यांचा सामना करण्याचे धैर्य आपल्यामध्ये असले पाहिजे. क्वाइट क्विटिंग करून कामाच्या बाबतीत आपले नाव बदनाम करणे हा काही यावरील उपाय नाही.

चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.

बातम्या आणखी आहेत...