आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअपयश - हिंदीत पहिला मोठा फ्लॉप २०१२ मध्ये आलेला चित्रपट ईगा दक्षिण भारतात यशस्वी ठरला. हिंदीत मख्खी फ्लॉप राहिला. हिंदीत चित्रपटाची कमाई एक कोटीपेक्षा कमी राहिली.
यश- योग्य भागीदाराची निवड हा चित्रपट अयशस्वी झाला. कारण मी योग्य भागीदार निवडले नव्हते. त्यांना चित्रपटांची तितकीशी आवड नव्हती. मी त्याच दिवशी ठरवलं होते की यापुढे मी अशा लोकांसोबत काम करेन ज्यांना माझ्या बरोबरीची किंवा जास्त आवड आहे.
अपयश - कर्जाच्या सापळ्यात अडकलो वडिलांनी अर्धांगी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, त्यात ते सहनिर्मातेही होते. सर्व जमा भांडवल वापरले. कुटुंब कर्जाच्या विळख्यात अडकले.
यश- गोष्टी गृहीत धरणे थांबवा १९९६ चा तो काळ आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. त्या गोष्टी मनात खोलवर बसल्या. विचार केला, यानंतर कोणतेही काम हलक्यात घेणार नाही.
अपयश-पहिल्या शूटवर हात थरथरत होते चित्रपट लेखनापासून सुरुवात केली. पण लेखक म्हणून चिडचिड झाली. आंध्र प्रदेश सरकारकडून पहिल्या चित्रपट दिग्दर्शनाची संधी मिळाली. शूटिंगच्या पहिल्या दिवशी हात थरथरत होते. यश- काम आणि स्वत: वर आत्मविश्वास चित्रपटात पैसे गुंतवणारा निर्माता दिग्दर्शकाचा आत्मविश्वास पाहूनच पैसे गुंतवतो. तुम्हाला कामावर व स्वतःवर विश्वास असेल तरच इतर लोक तुमच्यावर विश्वास दाखवतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.