आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • 'Bali To Kaan Pili' Is A Reality Even Today| Marathi Article By Chetan Bhagat

नवा विचार:‘बळी तो कान पिळी’ हे आजही एक वास्तव

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने जगाला धक्का बसला होता. अनेक तज्ज्ञांनाही याचा अंदाज आला नव्हता. संघर्ष दीर्घ काळापासून सुरू होता, पण रशिया पूर्ण ताकदीने युक्रेनवर हल्ला करेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. २०२२ मध्ये एक सार्वभौम देश दुसऱ्या देशावर हल्ला करू शकतो, हे अकल्पनीय आहे. जगाला धक्का बसला आहे. वृत्तवाहिन्यांवर नॉन-स्टॉप कव्हरेज आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ, मीम्स आणि लेखांचा पूर आला आहे. पाश्चात्त्य देशांनी एकजुटीने रशियाचा निषेध केला आहे. त्याच्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असूनही युक्रेन स्वतःहून अधिक शक्तिशाली शत्रूशी एकटा लढत आहे. युद्ध संपवण्याच्या मागण्या, युक्रेनियन लोकांना पाठिंबा आणि रशियाचा निषेध या सर्व गोष्टी आपापल्या ठिकाणी आहेत, पण या युद्धाने जीवन, मानवता आणि जगाविषयी काही कटू सत्येही समोर आणली आहेत.

एखाद्या गोष्टीने आपण फार लवकर दुखावून भडकत असल्यास याच्या पुढे वाचू नका. सत्याचा सामना करायचा नसेल आणि आदर्शवादीपणे ‘जे आहे’ ऐवजी ‘काय असावे’ यावर बोलायचे असेल तर कृपया वाचन थांबवा! कारण मी जे सांगणार आहे ते तुम्हाला अस्वस्थ करेल. ठीक आहे, तुम्हाला इशारा दिला गेला आहे. तर रशिया-युक्रेनपासून शिकण्यासारखे पाच धडे पुढे आहेत, हे आपल्यालाही लागू होतात.

कंटेंट आणि आभासी चर्चांचे व्यसनाधीन
वास्तव कितीही भयावह असले तरी युद्धांत नाटकाचे सर्व आवश्यक घटक असतात, ही वस्तुस्थिती आहे. तो अल्टिमेट रिअॅलिटी शो झाला आहे. जगाला न्याय मिळवून देण्यासाठी कितीही ट्विट आणि मागणी करत राहिलो तरी त्याचा बलाढ्य शत्रूवर काहीही परिणाम होत नाही. युक्रेनला इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ध्वजांकित करणे, फेसबुकवर त्याचे सांत्वन करणे व ट्विटरवर रशियावर टीका केल्याने काहीही होणार नाही. आपापल्या फोनमध्ये मग्न आपण कंटेंट व आभासी चर्चांचे व्यसनाधीन झालो आहोत. आपण दुर्बल होऊन लढणे विसरलो आहोत.

सामर्थ्य आणि क्षमता महत्त्वाची : रशियाच्या वागणुकीबद्दल तुमची नैतिक भूमिका काहीही असली तरी रशियाने हा हल्ला केला, कारण तो मजबूत आहे. युक्रेन तितका सामर्थ्यशाली नसल्याने तो मार खात आहे. आज प्रत्येकाला युक्रेनबद्दल सहानुभूती आहे हे खरे आहे, पण जीवनात -किंवा एक देश म्हणून-आपण सामर्थ्य शोधले पाहिजे, सहानुभूती नव्हे. क्षमता शोधावी, दया नव्हे.

कोणावरही विश्वास ठेवू नये : युक्रेनकडे अण्वस्त्रे होती. पाश्चिमात्य देशांनी अण्वस्त्रे नष्ट करण्यावर भर दिला व नि:शस्त्रीकरणासाठी हे शब्द योग्य आणि महान केले. युक्रेनने आपली अण्वस्त्रे टाकून दिली. गरज पडल्यास मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र आज कोणीही मदत करत नाही. भारतालाही अण्वस्त्रे टाकून देण्यास सांगण्यात आले होते. आपल्याला युद्धाची इच्छा असणारे, सामर्थ्य दाखवणारे, शांततेचे शत्रू इ. म्हटले गेले, पण युक्रेनमध्ये काय झाले ते तुम्ही पाहिले आहे. त्याच्याकडे अण्वस्त्रे असती तर असे झाले असते का? युक्रेनने विश्वास ठेवला आणि किंमत मोजली. जावनातही-किंवा एक देश म्हणून-कोणावरही विश्वास ठेवू नका. आणि तुमची सुरक्षा दुसऱ्याच्या हातात टाकू नका.

अधिक निर्दयी, अधिक शक्तिशाली : अमेरिकेकडे सर्वात शक्तिशाली शस्त्रे आणि कदाचित सर्वोत्तम संरक्षण शक्ती आहे, परंतु आज जग रशियाला घाबरते. लाखो मरण पावले तरी रशियाला पर्वा नाही, अमेरिकेला आहे. आज अमेरिका अण्वस्त्रे वापरण्याचा विचारही करू शकत नाही, तरीही रशियाचे ऐकावे लागते. आज जिथे अनेक देशांकडे जगाचा अंत करण्यास सक्षम शस्त्रे असताना फक्त सर्वात निर्दयी आणि क्रूर नेता सर्वात शक्तिशाली असल्याचे सिद्ध होते. त्यामुळेच आज उत्तर कोरियासारख्या छोट्या देशाकडेही इतकी सत्ता आहे.

जग सॉफ्ट आणि कमकुवत झाले आहे : सोशल मीडियावर भावनिकता आणि स्वरांचे वर्चस्व आहे. न्याय, समानता, करुणा यांची मागणी केली जात आहेत. ब्रँडदेखील या गोष्टींचा फायदा घेऊन कमाईची संधी सोडत नाहीत. मतांवर डोळा असल्याने राजकारणी त्याला प्रोत्साहन देतात. आज असे मानले जात आहे की, आपण जितके जास्त विरोध करून आणि व्यक्त होऊ तितक्या चांगल्या गोष्टी मिळतील. जगाला आणि जनतेला न्याय हवा, हा गैरसमज यामागे आहे. तथापि, जग कधीच न्याय्य नव्हते आणि कधी असणारही नाही. बलवान नेहमीच दुर्बलांचा पराभव करतो. त्यामुळे बळीचे कार्ड खेळून स्वत:ला कमकुवत बनवण्याऐवजी बलवान बनण्याचा प्रयत्न करा. मानवतेचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे. पूर्वी लोक बाण आणि तलवारी चालवत असत, आज ते रिल्स बनवतात आणि पोस्ट लिहितात. यातील फरक पाहा.

युद्ध एक कंटेंट आणि आपण एकटे आहोत : वास्तव कितीही भयानक असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की, युद्धांमध्ये नाटकासाठी आवश्यक असलेले सर्व घटक असतात. तो अल्टिमेट रिअॅलिटी शो होऊ शकतो आणि झाला आहे. सोशल मीडिया प्रभावकांपासून ते सामाजिक-न्याय योद्धे आणि आभासी सिग्नलर्सपर्यंत प्रत्येक जण युक्रेनबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त करत आहे. हे सर्व सहसा लाइक्स, टिप्पण्या आणि व्यग्रतेसाठी केले जाते. आपल्यापैकी अनेक जण स्थिती बदलण्यासाठी काहीही करू शकत नाहीत, तरीही आपण या भयानक कंटेंटला चिकटून राहतो. आयुष्यातही असेच घडते. आपण दु:खी असतो तेव्हा जगाच्या मोठ्या भागासाठी फक्त गप्पांचे साधन असतो. मोजक्या लोकांना आपली काळजी असते.
गेल्या अनेक दशकांनी आपल्यासमोर जग हे शांत आणि न्याय्य स्थान असल्याचा भ्रम निर्माण केला होता. ते खोटे आहे. प्रत्येक मानवाने आणि देशाने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. तो बलवान नसेल तर काही सामर्थ्यवानांचा गुलाम होईल. भावना आणि आदर्शवादाने फरक पडत नाही, क्षमता आणि सामर्थ्य महत्त्वाचे आहे. युद्ध लवकरच संपेल, अशी आशा आहे. पण, याबरोबरच युद्धाने शिकवलेले धडे नेहमी लक्षात ठेवावेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...