आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:समर्पणाने जिंकण्याचा बाप्पाचा फंडा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गणेश आणि त्याचा भाऊ कार्तिकेय यांच्यातील स्पर्धेची रंजक कथा आहे. एकदा देवर्षी नारदांनी कैलास पर्वतावर शिवाला एक आंबा दिला, तो भगवान ब्रह्मदेवाने त्यांना दिला होता. ते म्हणाले होते की, जो कोणी हा आंबा खाईल त्याला ज्ञान आणि कुशाग्र बुद्धी प्राप्त होईल. तो कोणत्या पुत्राला द्यायचा या संभ्रमात भगवान शिव होते. मग त्यांनी माता पार्वतीशी सल्लामसलत केल्यानंतर दोन भावांमध्ये स्पर्धा आयोजित केली, त्याचे बक्षीस हा आंबा होता. तीन वेळा जगाला प्रदक्षिणा घालून जो प्रथम परतेल तो जिंकेल हे आव्हान होते. यामुळे श्री गणेश अडचणीत आला, कारण त्याचे वाहन उंदीर होते, तर कार्तिकेयाचे वाहन मोर होते. पापणी लवते न लवते तोच कार्तिकेय मोरावर बसून निघून गेला.

दरम्यान, श्री गणेशाने आई-वडिलांना बोलावून त्यांना एकत्र बसवले आणि हात जोडून त्यांना तीन वेळा प्रदक्षिणा केली. मग तो म्हणाला, मला आंबा द्या.’ स्पर्धेची अट त्याने पाळली नाही, असे आई-वडिलांनी सांगताच श्री गणेश डोळ्यात चमक दाखवत म्हणाला, ‘माझे आई-वडील हेच माझे जग आहे, तेव्हा मी तुम्हाला तीन प्रदक्षिणा मारल्या, हे जगाला प्रदक्षिणा करण्यासारखेच आहे.’ अशा प्रकारे त्याने आपल्या बुद्धीचे फळ जिंकले.

आजच्या मुलांनी या कथेमागचे तर्कशास्त्र विचारले तर अनेक पालकांना ते सांगता येणार नाही. केवळ ही कथाच नाही, तर पुराणात, इतिहासात, इतर ग्रंथांमध्ये अशा हजारो कथा आहेत, ज्यांचे स्पष्टीकरण मानवी तर्काने करता येत नाही. म्हणूनच काही गोष्टी तर्काच्या पलीकडे असतात, असे शास्त्रात लिहिले आहे. परंतु, तुम्ही काय अर्थ काढला, यावर कथेचा संदेश अवलंबून आहे. उदा. वरील कथेत हे संदेश आहेत : १. आई-वडील जगातील सर्वात महत्त्वाचे आणि पवित्र आहेत, २. आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नका आणि ३. कधी कधी एखाद्या क्षेत्राच्या ज्ञानापेक्षा सॉफ्ट स्किल्स यशासाठी अधिक महत्त्वाचे असतात. मला अवघड काम मिळालं की मी वाद घालत नाही, मी फक्त पुराणातल्या अशा कथा आठवून नवीन काय करू शकतो याचा विचार करू लागतो. अशीच एक घटना घडली - २००८ मध्ये मला ‘झी’चे चेअरमन सुभाष चंद्रा आणि भास्कर ग्रुपचे तत्कालीन चेअरमन दिवंगत रमेशचंद्रजी अग्रवाल यांनी माझ्यासाठी पूर्णपणे नव्या एका शहरात वृत्तपत्र सुरू करण्यासाठी आमंत्रित केलेे. मला ५४ दिवसांत वर्तमानपत्र सुरू करायचे होते, अशी अट होती. ते किती अशक्य होते हे पत्रकारितेतील ज्येष्ठांना समजू शकते. चांगले पत्रकार शोधणे हीच किमान तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. मी तत्कालीन पोलिस आयुक्तांकडे गेलो व त्यांना नव्या वृत्तपत्राबद्दल सांगून शहरातील सर्वोत्तम क्राइम रिपोर्टर शोधण्यासाठी मदत मागितली. त्यांनी दहा नावे दिली, ती आम्ही लिहून घेतली. ऑफिसमधून बाहेर पडताना मी त्यांना विचारले, ‘सर, आणि कोणत्या क्राइम रिपोर्टरला फोन करू नये?’ त्यांनी तीन नावे दिली. आम्ही ऑफिसमध्ये जाऊन फक्त त्या तिघांनाच मुलाखतीसाठी बोलावले आणि दोघांची नियुक्ती केली. कारण एखाद्या पत्रकाराने त्यांच्या विभागाविरोधात लिहिल्यास पोलिस आयुक्त चिडतील, हे आपल्याला माहीत आहे. पत्रकारांची निवड करण्यापूर्वी आम्ही या विचारसरणीला अनेक स्रोतांद्वारे पुष्टी दिली. फंडा असा की, आपण आपल्या वरिष्ठांच्या आदेशासाठी समर्पण करतो तेव्हा आपल्याला जिंकण्याच्या किंवा वेळेवर कामे पूर्ण करण्याच्या कल्पना मिळतातच.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...