आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआईने खूप प्रेम केले, त्या प्रेमाने विश्वास दिला की आयुष्यात काहीही साध्य करू शकतो : ओबामा
अॅन डनहम यांचे पुत्र बराक ओबामा
(अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष)
माझी आई, अॅन डनहम यांचा माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव आहे. माणुसकीवर त्यांचा गाढ विश्वास होता म्हणूनच मी प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा सन्मान करावा, यावर त्यांनी सातत्याने भर दिला. माहीत नाही कसे, मात्र तारुण्यातच त्यांना कळले होते, की तुम्ही मुलांवर प्रेम करत असाल तर मुबलक सुविधा आणि साधने नसले तरी ते आनंदी, उत्साही राहू शकतात आणि तुम्ही त्यांना सांगता की ते काहीही साध्य, प्राप्त करू शकतात,ते करून दाखवतात. मी जेव्हा १२-१३ वर्षांचा होतो, तेव्हा त्या पालक असण्यासोबतच मित्रासारखी वागणूक द्ययाला लागल्या. मी असे म्हणत नाही की हा पालकत्वाचा एखादा आदर्श फॉर्म्युला आहे, मात्र मी हे नक्कीच शिकलो की अटी न ठेवता केलेले प्रेम तुम्हाला खूप काही बनवू शकते. वयाच्या २० व्या वर्षानंतर अशीही वेळ आली की व्यग्रतेमुळे त्यांच्याशी खूप कमी वेळा बोलणे व्हायचे. मला वाटते की शेवटी तुम्ही त्यांचेच अधिक स्मरण करता ज्यांचे तुमच्यावर प्रेम होते. अनेकदा विचार करतो, की जर मी त्यांच्यासोबत आणखी जास्त वेळ घालवू शकलो असतो, तर कळले असते की त्या काय विचार करत होत्या? काय करत होत्या? कारण माझ्या आयुष्यात त्यांचे महत्त्व खूप मोठे होते.
आईने शिकवले, लक्ष्य गाठल्यास तो एक टप्पा मानून त्यालाच मोठे लक्ष्य बनवा : नीरज चोप्रा
मी लहान होतो तेव्हा आईने दोन गोष्टी मला माझ्या मेंदू आणि हृदयात ठेवण्यासाठी सांगितल्या. ‘पहिली म्हणजे, तू तुझे कष्ट करत राहा. दुसरा काय करत आहे, किती कष्ट करत आहे याचा विचार करू नको. स्वत:वर विश्वास ठेव. जेव्हा काहीतरी मिळवशील तेव्हा सर्वकाही मिळवले हा विचार करू नकोस. ते लक्ष्य आपल्या प्रवासाचा एक टप्पा मानून त्याला आणखी मोठे लक्ष्य बनव. मग ते मिळवून दाखव. तू सर्वोच्च कामगिरी केलीस याचा आनंद असू दे. आधीही हरलो नाही, यानंतरही हरणार नाही, ही भावना कायम मनात असू दे.’ मला आताही जी शिकवण मिळते, ती लक्ष्यपूर्वक ऐकतो. आता ऑलिम्पिक विक्रम आणखी नव्या उंचीवर नेण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
नीरजच्या आई सरोज चोप्रा सांगतात- माझे त्याच्या खेळाबाबत बोलणे होत नाही, मात्र जेव्हा बोलणे होते तेव्हा तो म्हणतो की, ‘आई अजून खूप पुढे जायचे आहे.’ त्याच्या या इच्छाशक्तीने त्याला जीवनात खूप न्यावे, अशी प्रार्थना मी करते. प्रत्येक आईने आपल्या मुलाला त्याचे उदाहरण द्यावे, असा आदर्श त्याने निर्माण करावा. - सरोज चोप्रा यांचे पुत्र नीरज चोप्रा
ऑलिम्पिक चॅम्पियन अॅथलिट
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.