आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॅपटॉप सध्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र,याची बॅटरी आणि तिच्या लाइफबाबत नेहमीच निष्काळजीपणा होतो. बऱ्याचदा सततच्या चार्जिंगमुळे बॅटरीचे आयुष्य घटते. लॅपटॉपचे बॅटरी लाइफ जास्त टिकावे याची माहिती जाणून घेऊया...
{चार्ज करण्याआधी बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज हाेऊ द्यावी का? नाही, ये योग्य नाही. बहुतांश लॅपटॉप बॅटऱ्या लिथियम आयन वा लिथियम पॉलिमरपासून तयार होतात. अशा बॅटऱ्यांचे लॅपटॉप सतत चार्ज केल्यास अडचण नाही. मात्र, लॅपटॉप सतत १००% चार्ज ठेवल्याने बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी ४०% ते ८०% पर्यंत चार्ज ठेवा. {बॅटरी व चार्जरच्या दर्जाचाही परिणाम होतो? हो, स्वस्त बॅटरी व खराब दर्जाचा चार्जर लॅपटॉप लवकर खराब करू शकते. अशात लॅपटॉपचे चार्जर वा बॅटरी खराब झाल्यानंतर लॅपटॉपचा अधिकृत विक्रेता किंवा कंपनीशी बोलून बदलले पाहिजे. याशिवाय खराब चार्जिंग पाॅइंटमुळेही लॅपटॉपची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. {लॅपटॉपचा चार्जर चांगला आहे की नाही हे कसे कळू शकेल? चार्जिंग पॉइंटकडून अॅडप्टर व लॅपटॉप दोघांना व्होल्टेज योग्य मिळेल हे पाहावे. यासोबत अॅडप्टरमध्येमध्ये येणारा करंट लॅपटॉपमध्ये येणाऱ्या करंटपेक्षा कमी होऊ नये. म्हणजे, चार्जरची तार वा प्लगमध्ये बिघाड नसावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.