आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागरूकता:सतर्क राहा...

मोहिनी भंडारी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

{ बद्धकोष्ठता किंवा लूज मोशन दोन-तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ होत असेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. { श्वास घेण्यास त्रास : काही दिवसांत, पायऱ्या चढताना किंवा वेगाने चालत असताना, किंवा विनाकारण श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. { ताप : संध्याकाळी ताप येणे किंवा सकाळी उठल्यावर अंग गरम वाटणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तपासणी करा. { गिळण्यास त्रास होणे : काही दिवसांपासून अन्न गिळण्यास त्रास होत असेल, तर ते सामान्य समजू नका. डॉक्टरांशी संपर्क साधा. { जखमा बऱ्या न होणे : किरकोळ दुखापत किंवा काही दिवसांपासून तोंडात फोड येत असल्यास आणि ते बरे होत नसल्यास डॉक्टरांना भेटा. { अचानक चक्कर येणे : कधी कधी बसून उठताना किंवा चालताना हलकीशी चक्करही आली, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. { वेदना होणे : शरीराच्या कोणत्याही भागात, विशेषत: अचानक छाती आणि डाव्या हाताच्या वरच्या भागात वेदना होत असतील तर दुर्लक्ष करू नका. हे हृदयविकाराशी संबंधित असू शकते. { झोपेच्या अडचणी : सकाळी उठताना अशक्तपणा येणे, दिवसभर झोप आल्यासारखी वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. { भावना उंचबळून येणे : कधी कधी खूप रडण्याची इच्छा होत असेल किंवा कधी विनाकारण हसू येत असेल आणि त्यावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.