आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:श्वासांबाबत जागरूक व्हा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपण कोणतेही काम केले तरी त्यात यशाची इच्छा असते. यश मिळाले की अभिमानाने भरून येते. अपयश आल्यास दुःखात गुंतून जातो. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी श्वासावर मेहनत घेतली पाहिजे. आपण श्वासाशी जोडतो तेव्हा ते आपल्या आसक्तीवर नियंत्रण ठेवते आणि आपल्यामध्ये इच्छाशून्यता निर्माण करते. आपण २४ तासांत २१,६०० श्वास घेतो. थोडं मागे गेलं तर बारा तासांत १०,८००, एका तासात ९०० आणि एका मिनिटात १५ श्वास. हा आकडा जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण हा श्वास आपल्या शरीराचे संचालन करतो. आता २१,६०० चा हा आकडा आपल्या सोयीनुसार श्वासाच्या जाणिवेने फॉलो करा. एका मिनिटात १५ श्वासांत किंवा तासाभरात ९०० श्वासांत उठलात, तरी जागे अवश्य व्हा. त्यामुळे झोपता-उठता आपल्या श्वासाविषयी जागरूक राहा. मग जगातील कोणीही आपल्याला अशांत करू शकणार नाही.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...