आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:सावध राहा व सुरुवात करा

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैसे कमावायला निघाला असाल तर दोन गोष्टींचा संकल्प करा ः प्रामाणिकपणा आणि मेहनत. तसेच दोन गोष्टी आयुष्यात कधीही येऊ देऊ नका ः भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी. देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीत पैसे कमावण्याच्या शक्यता वाढत आहेत. या संधीचे त्वरित सोने केले पाहिजे. आपल्यामध्ये तीन व्यक्ती आहेत, त्या त्यात अडथळा आणतील. निष्काळजीपणा, आळस आणि प्रमाद ही त्यांची प्रतीकात्मक ओळख आहे. निष्काळजीपणा म्हणजे अपयश. नफ्याऐवजी तोट्यालाच आमंत्रण. आळस म्हणजे सुस्तपणा आणि उत्साहाचा अभाव. प्रमाद म्हणजे एक प्रकारची नशा. तुम्ही कमावता आणि खर्च करता तेव्हा हिशेबातही काळजी घ्या. स्वामी विवेकानंद म्हणायचे की, तुम्ही कोणाकडून काही पैसे घेतले असतील, मग ते वेतन असो वा दान, त्याचा हिशेब झाला पाहिजे. विवेकानंद हिशेबात कमकुवत असलेल्या व्यक्तीला गुन्हेगार मानायचे. याबाबत सावध राहा आणि सुरुवात करा. तुम्हीच पैशाची वाट पाहत नाही, तर संपत्तीही तुमची वाट पाहत आहे.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...