आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:मदतीबाबत सावधगिरी बाळगा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपण एखाद्या व्यक्तीवर मेहनत घेत असतो किंवा एखाद्याला दान देत असतो तेव्हा शहाणा शेतकरी बियाण्याबाबत घेतो तशीच काळजी घेतली पाहिजे. बियाण्यात थोडीशी चूक झाली तर त्याची उगवण नष्ट होते. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर मेहनत घेत असाल, घरात कोणाचे आयुष्य घडवत असाल किंवा कोणत्याही संस्थेला-व्यक्तीला दान देत असाल तर आधी तो योग्य आणि सत्यवादी आहे का, हे पाहा. अन्यथा, बियाणे वेगवेगळ्या पद्धतीने पेरले तर त्याचे परिणाम वेगळे असतील, त्याप्रमाणे होईल. बियाणे वाटेत टाकले तर ते कधीही वाढणार नाही. शेताच्या बांधावर फेकल्यास ते लोकांच्या पायाखाली येईल आणि तेच बी शेतात टाकल्यास उगवण्याची शक्यता असते. पण, धोका शेतातही आहे आणि तो आहे तणांचा. शेतकऱ्याने ते योग्य वेळी काढले नाही तर हे गवत पीक खाऊन टाकते. एखाद्याला दिलेली वागणूक, त्याने केलेली मदत, त्याला दिलेले दान हे बीजाप्रमाणे काळजीपूर्वक पेरले पाहिजे. अन्यथा तुम्ही त्याचे काम चांगल्या मनाने करत आहात, त्याला दान देत आहात, पण तो त्याचा गैरवापर करेल

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...