आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यंगस्नान:मीस्ट स्प्रेने व्हा ताजेतवाने

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभ्यंगस्नान : अभ्यंगस्नान हा शरीराच्या तेल मालिशचा एक प्रकार आहे. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह अधिक सुरळीत होण्याबरोबरच मानसिक ऊर्जेचंही संतुलन साधलं जातं. पहाटेच्या वेळी तीळ, मोहरी अथवा नारळाच्या तेलाने शरीराला हलक्या हाताने मालिश करावी. तुम्ही योगासन, जिम, सायकलिंग किंवा कुठल्याही मैदानी क्रीडा प्रकाराच्या क्षेत्रात सक्रिय असाल तर तुमच्यासाठी अभ्यंग अत्यंत आवश्यक आणि लाभकारी आहे. कारण यामुळे स्नायू लवचिक होतात. कुठल्याही अॅक्टिव्हिटीदरम्यान स्नायूंवर ताण येण्याची शक्यता कमी होते.

रोपांवर पाण्याचा स्प्रे मारला की रोपं टवटवीत दिसतात. अगदी तसेच थकलेल्या चेहऱ्यावर मीस्ट स्प्रे वापरला तर चेहराही ताजातवाना दिसू लागतो. वातावरण बदलामुळे चेहरा कधी तेलकट तर कधी शुष्क होतो. कधी-कधी त्यावर पिंपल्सही येतात. अशा वेळी घरच्या घरी बनवलेला मीस्ट स्प्रे तुम्हाला फ्रेश दिसण्यासाठी मदत करेल.

{ कोरफड लिंबू : कसा करायचा?- एक कप पाणी, दोन कोरफडी, एक लिंबू. एक कप पाणी चांगलं उकळून घ्या. नंतर कोरफडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. हे कोरफडीचे तुकडे आणि उकळलेलं पाणी मिक्सरमध्ये एकत्र करून त्याचा ज्यूस तयार करून घ्या. हा ज्यूस चहाच्या बारीक गाळणीने गाळून घ्या. यामध्ये लिंबाचा रस एकत्र करा. थंड झाल्यावर हा स्प्रे बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. आवश्यकतेनुसार वापरा. { ग्रीन टी, व्हिटॅमिन ई : कसा करायचा? - दोन कप पाणी, एक ग्रीन टी बॅग, सहा ते सात थेंब व्हिटॅमिन ई तेलाचे थेंब,. एका पातेल्यात दोन कप पाणी घेऊन ते पाच मिनिटांपर्यंत उकळून घ्या. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ग्रीन टी बॅगमधील साहित्य टाका. १५ मिनिटं मंद आचेवर उकळू द्या. शेवटी व्हिटॅमिन ई तेलाचे थेंब टाकून गॅस बंद करा. हे मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ स्प्रे बाटलीमध्ये भरा. फ्रिजमध्ये याचा रोज वापर करा. { संत्रे-पेपरमिंट : कसा करायचा? - एक संत्रे, एक लिंबू, पेपरमिंट आणि लव्हेंडर तेल प्रत्येकी पाच पाच थेंब, पाच छोटे चमचे गुलाबपाणी. संत्र्याचा रस काढून घ्या. आता या रसामध्ये लिंबाचा रस, पेपरमिंट आणि लव्हेंडर तेलाचे थेंब टाकून चमच्याने मिश्रण एकजीव करून घ्या. वरून गुलाबपाणी टाका. नंतर हे मिश्रण साफ सुती कपड्याने गाळून घेऊन स्प्रे बाटलीमध्ये भरून ठेवा. हा मीस्ट स्प्रे फ्रिजमध्ये ठेवून रोज वापरू शकता.

बातम्या आणखी आहेत...