आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Be Sure To Demonstrate What You Learn In Class | Article By Rishikesh T. Krishnan

दृष्टिकोन:वर्गात जे काही शिकाल त्याचे प्रात्यक्षिक अवश्य करून पाहा

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात भारत प्रतिभेचा जगातील सर्वात मोठा कारखाना होईल, असे मानले जात आहे, कारण २०४७ पर्यंत देशात जगातील २० टक्के कार्यरत लोकसंख्या असेल. स्वावलंबी भारताच्या संकल्पनेचा पाया हा आपल्या देशाच्या स्वत:च्या साधनसंपत्तीतून निर्माण झालेला आत्मविश्वास आहे. तरुण संसाधनांची ऊर्जा, उत्साह आणि क्षमता हे ही संकल्पना साकार करण्याचे इंधन आहे. एक शिक्षक या नात्याने पुस्तकी शिक्षणासोबत व्यावहारिक उपयोगाची समज हे शिक्षणाचे सदाबहार स्वरूप आहे, असे मला वाटते. त्यासाठी शिक्षकाचे ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. आज देशात अनेक नवीन उद्योग आकार घेत आहेत. संधींची नवीन दारे उघडत आहेत, पण या संधींचा फायदा घेण्यासाठी आपल्याला अनेक कौशल्ये आणि क्षमता असलेल्या तरुण संसाधनांची गरज आहे. प्रत्येक दिशेला शक्यता असल्याने आपल्या नव्या पिढीसमोर पर्यायांना मर्यादा नाही. प्रत्येक मुलाची आवड आणि ध्येयासाठी पूर्ण वाव आहे. फक्त गरज आहे त्यांनी ती विशिष्ट आवड पूर्ण आत्मविश्वासाने अंगीकारण्याची आणि त्यात सर्वोत्तम योगदान देण्याची.

हा करिअरचा प्रवास खूप महत्त्वाचा आहे, कारण तो तुमचा प्रवास आहे. वाचन आणि शिकण्यात शॉर्टकट शोधू नका. यामुळे तुमचा शिकण्याचा मार्गही छोटा होईल. तुम्ही पुस्तके किंवा वर्गांपुरते मर्यादित राहावे, असा याचा अर्थ नाही. मजा करा, पण ओटीटी प्लॅटफॉर्मसारख्या तुमचा बराच वेळ घेणाऱ्या गोष्टी टाळा. तुमच्या क्षमता आणि स्वारस्य तुमच्यापेक्षा चांगले कोणीही जाणत नाही. दुसऱ्याने निवडलेल्या विषयात किंवा करिअरमध्ये आपले सर्वोत्तम योगदान देणे अवघड असते. परंतु, तुम्ही क्षमता आणि आवडीची पातळी खूप उंचावली तर आजूबाजूच्या लोकांच्या शंका दूर होतील. हीच प्रात्यक्षिकाची ताकद आहे. मनाचे ऐकणे, मनातले व मनाने करणे हे खूप महत्त्वाचे आहे, परंतु त्यासोबतच आपली तंदुरुस्ती आणि झोपेचीही पूर्ण काळजी घेतली पाहिजे.

शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक परिस्थिती आणि संदर्भ अनुभवणे. देशात आणि जगात भरपूर प्रवास करा. नवीन ठिकाणांना भेट द्या, नवीन लोकांना भेटा आणि संपर्क निर्माण करा. विविध अनुभवांचा खजिना गोळा करा. शिक्षण आणि रोजगार यात अजूनही खूप अंतर आहे. शैक्षणिक संस्थांना उद्योगांच्या गरजा समजून घेऊन पुढे जावे लागेल. त्याच वेळी संस्थांना देखील उदयोन्मुख क्षेत्रे व उद्योग ओळखावे लागतील आणि त्यांच्या शिक्षकांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण द्यावे लागेल. शिक्षण आणि रोजगार यातील दरी कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शक्य तितके प्रकल्प आणि इंटर्नशिप. कम्युनिकेशन, डेटा विश्लेषण, डेटा व्हिज्युअलायझेशन, कथाकथन, डिझाइन थिंकिंग ही अतिशय शक्तिशाली आणि उपयुक्त कौशल्ये आहेत. त्यांचा सराव करा आणि त्यांना तुमची ताकद बनवा. वर्गात किंवा वर्गाबाहेर, तुम्हाला संकल्पना पूर्णपणे समजेपर्यंत प्रश्न विचारा. तुम्ही वर्गात जे शिकता त्याचा व्यावहारिक उपयोग नक्की करा. आपण व्यावहारिक माहिती कधीही विसरणार नाही. अनेकदा मोठ्या संधी आपल्या हातातून निसटतात किंवा आपल्याला योग्य संधी दिसत नाही आणि आपण स्वतःला अयशस्वी समजतो. याचे कारण काय? आपली सर्वात मोठी चूक म्हणजे आपली क्षमता किंवा स्वारस्य जुळत नसणारे करिअर आपण निवडतो. त्यामुळे त्याचे फळ नेहमी सरासरीच असेल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) ऋषिकेश टी. कृष्णन संचालक, आयआयएम बंगळुरू director@iimb.ac.in

बातम्या आणखी आहेत...