आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर विशेष:ज्यावर आपला विश्वास तेच करावे, हाच ऑस्करचा धडा

छत्रपती संभाजीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिकी गोन्साल्विस या आयआयटी मंडीच्या संस्थापक-संचालक आणि अमेरिकन इतिहासकाराची मुलगी आहे. ती बंगळुरूहून उटीला घरी जात असताना वाटेत अचानक काही तरी दिसल्याने ती थांबली. तिने बोमनला पाहिलं होतं आणि रघूसोबतच्या त्याच्या स्नेहपूर्ण नात्याने ती प्रभावित झाली होती. सेल्फ-मेड चित्रपट निर्माती कार्तिकीने पुढील पाच वर्षे बोमन, त्याची भावी पत्नी बेली आणि रघू व अम्मू यांच्या चित्रीकरणासाठी घालवली. दक्षिण भारतातील मदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये रघु आणि अम्मू हे दोन तरुण हत्ती राहत होते. कार्तिकीला या ठिकाणाशी चांगलीच परिचित होती. तिने तिच्या गो-प्रो फोन आणि डीएसएलआर कॅमेऱ्याने चित्रपट शूट केला. तिच्यात धाडस आणि जोश भरलेला होता. तिने एकूण ४०० तासांचे फुटेज शूट केले, नंतर ते ४० मिनिटांपर्यंत संपादित केले. परिणामी ‘द एलिफंट व्हीपर्स’ नावाचा चित्रपट तयार झाला. याने अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सची मने जिंकली. त्याला यावर्षी सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. कार्तिकीने नेटफ्लिक्सला सुरुवातीचे रील दाखवले होते आणि निर्माता म्हणून गुनीत मोंगा यांची मदत घेतली होती, त्याने आधीच पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रतिष्ठा निर्माण केली आहे.

या वेळी ऑस्कर सोहळ्यात भारताला दोन पुरस्कार मिळाले आहेत. ते आत्मविश्वास आणि संयमाचे यशदेखील आहेत. एम.एम. किरावानी यांना पहिल्यांदा प्रसिद्धी मिळवून देणारे गाणे १९९१ मध्ये आले - ‘जामू राहित्री’. ते ‘क्षणा क्षणम्’ या तेलुगु चित्रपटात होते. त्याचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा होते. श्रीदेवी पडद्यावर होती, तिच्यासोबत व्यंकटेश दिसला. हिरवळीच्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल्या किरावानी यांनी या गाण्याच्या ध्वनी रचनेत वेगळ्या प्रकारची संवेदनशीलता आणली. ६१ वर्षीय किरावानी खूप अाध्यात्मिक आहेत आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा एक काळ संन्यासी म्हणून व्यतीत केला आहे. आपल्या अकाली मृत्यूची भविष्यवाणी टाळण्यासाठी त्यांनी असे केले. आज ते उत्पन्नाचा मोठा भाग धर्मादाय कार्यासाठी देतो. आज त्यांच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे, तेव्हा त्यांचा जीवनाचा प्रवास संथ, स्थिर आणि पद्धतशीरपणे आपल्यासमोर उभा राहिला आहे. या ऑस्कर सोहळ्यातून आपल्याला एखादा धडा शिकता येतो, तो म्हणजे संथ, पण नियमितपणे चांगले काम करणारा अखेर शर्यत जिंकतो. मलेशियन अभिनेत्री मिशेल योह यांनी जॅकी चॅनच्या चित्रपटांमध्ये मार्शल आर्ट््स तज्ज्ञ म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. ‘टुमॉरो नेव्हर डाइज’ आणि ‘क्राउचिंग टायगर हिडन ड्रॅगन’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांना ओळख मिळाली. आज त्या ६० वर्षांच्या आहेत आणि ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला आहे. व्हिएतनामी-अमेरिकन अभिनेता, ह्यू क्वानने स्टीव्हन स्पीलबर्गच्या इंडियाना जोन्स आणि टेम्पल ऑफ डूममध्ये बाल कलाकार म्हणून काम केले. हा चित्रपट १९८४ मध्ये आला होता. आज जवळपास तीन दशकांनी त्याने ‘एव्हरीथिंग...’ मध्ये मिशेलच्या पतीची भूमिका केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला आहे.

२०२३ चा ऑस्कर सोहळा हा केवळ विविधतेचा सन्मान करण्यापुरता नव्हता, तर दक्षिण आशियाई कलावंत आता जगात उदयास येत आहेत याचा पुरावा होता, कारण त्यांची कथाकथन करण्याची शैली वेगळी आहे. दक्षिण भारतीय कलाकार नृत्य आणि गाण्यात पारंगत आहेत आणि ‘नाटू नाटू’ हे त्याचे एक भक्कम उदाहरण आहे. संदेश स्पष्ट आहे. ज्यात तुम्ही निपुण आहात आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे तेच करावे. यथावकाश तुम्हाला यश मिळेलच. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला पश्चिमेची नक्कल करण्याची गरज नाही. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

कावेरी बामजई पत्रकार आणि लेखिका kavereeb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...