आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशासाठी ? फोटोसाठी..!:सौंदर्य : कृत्रिम अन् नैसर्गिक

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कितीही सौंदर्य प्रसाधनं वापरली, तरी नैसर्गिक सौंदर्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. सौंदर्य उत्पादनाच्या जाहिरातीतल्या प्रसाधनांनी सजलेल्या स्त्रीच्या पोस्टरच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या महिलेचा टिपलेला हा फोटो...

बा जारत फिरत असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मला ‘भले मोठे’ ब्यूटी क्वीनचे पोस्टर दिसले आणि अगदी त्यांच्या खालीच एक मध्यमवयीन भाजी विक्रेतीही दिसली. पोस्टरवरील स्त्री सौंदर्य, जाणीवपूर्वक राखले गेलेले प्रमाणबद्ध शरीर, ओढूनताणून आणलेले हसू... त्याविरोधी भाजी विक्रेतीचे साधे राहणीमान, भडक रंगाच्या नक्षीदार साडीचा खांद्यावरून अंगभर घेतलेला पदर, नाकातील मोरणी, कानातील झुबके आणि टॉप्स, तिचे स्वच्छ पांढरेशुभ्र दात, दुनियेचा क्षणभर विसर पडावा असे निखळ हसू... हे विरोधाभासी सौंदर्याचे समीकरण मला खूप भावलं. ते दुर्मिळ दृश्य मी कॅमेऱ्यात टिपले. या विरोधाभासी वास्तव दृश्याने मी अस्वस्थ झाले.

आजच्या बाजाराधिष्ठित जगात माणसाचे मोठ्या वेगाने वस्तूकरण होत आहे. भांडवली बाजारात प्रत्येक वस्तू विकण्यासाठी स्त्री देहाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यासाठी स्त्री देहाचे प्रमाणीकरण केले जाते. या प्रमाणीकरणातून भांडवली बाजार स्वत:च्या सोयीच्या अशा सौंदर्यशास्त्राची निर्मिती करतो आणि स्त्रीला उत्पादनाच्या विक्रीसाठी उभी करतो. एकीकडे जाणीवपूर्वक सौंदर्याची जोपासना आणि दुसरीकडे लाभलेले सौंदर्य असे विरोधाभासी चित्र आणि हे चित्र पाहिल्यानंतर साहिर लुधियानवींचे खालील बोल आठवतात.... ‘औरत ने जनम दिया मर्दो को और मर्दो ने उसे बाजार दिया।

प्रियंका सातपुते संपर्क : ७३८५३७८८५६