आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता:अॅपमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी...

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तं त्रज्ञानातील प्रगतीसोबतच उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग समोर येत आहेत. इंटरनेटवर असे अनेक अॅप्स किंवा वेबसाइट्स अशा आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही पैसे कमावू शकता. आजकाल अशा अनेक ऑफर्सचा भडिमार प्रत्येकाच्या मोबाइलवर सतत होत असतो. पण यापैकी कोणता मार्ग योग्य आहे, मार्ग निवडण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी, याबदद्ल जाणून घेऊया...

क्रीडा आणि गेमिंग अॅप या अॅप्समध्ये पैसे गुंतवून गेम खेळले जातात. जिंकण्यावर बक्षिसे मिळतात, त्यामुळे या अॅपचं व्यसन लागण्याची शक्यता असते. यामुळे लोक त्यात पैसे गुंतवत राहतात आणि खेळत राहतात. यामध्ये इंटरनेट बँकिंग आणि यूपीआयद्वारे पैसे दिले जातात. बँक खाते अॅपशी जोडलेले असल्यामुळे अॅपवाल्यांसाठी तुमची फसवणूक करणे सोपे होते. त्यामुळे रिवॉर्ड तर मिळत नाहीत, पण तुमची वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे जमा होते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसू शकतो. सहसा हे अॅप्स प्ले स्टोअरमध्ये नसतात, ते लिंकद्वारे डाऊनलोड करण्याची पद्धत असते.

कॉल आणि लिंक्स कधी-कधी बनावट कॉल करून, त्यामध्ये मोठ्या कंपनीचे नाव वापरून तुम्ही रोख बक्षीस जिंकल्याचे सांगितले जाते. फोनवर संबंधित कंपनी तुमच्याशी बोलल्यानंतर तुमच्या मेसेजवर लिंक पाठवते. त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते. ही लिंक म्हणजे व्हायरसही असू शकतो. त्यावर क्लिक केल्यावर डेटा चोरीला जाऊ शकतो, खात्यातले पैसे काढले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, मेसेंजरवर ओळखीच्या व्यक्तींना लिंक शेअर करून पैसे कमावण्याचे अमिष दाखवले जाते. ही डेटा चोरीची एक पद्धत आहे.

फ्री लान्सिंग अॅप्स टायपिंग, डेटा एन्ट्री, व्हिडिओ किंवा जाहिरातीमधून फ्रिलान्सिंगच्या माध्यमातून पैसे कमवण्याची ऑफरदेखील दिली जाते. सुरुवातीला ते छोटी कामे सोपवतात.पैसेही देतात. कालांतराने मोठे काम देऊ लागतात मात्र काही दिवसांनी ते संपर्कच ठेवत नाहीत.

सर्वेक्षण बक्षीस यामध्ये कोणत्याही व्हिडिओ किंवा वस्तूशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. लोकेशन चालू असल्यामुळे तुम्ही कधी आणि कुठे गेला होता हेदेखील त्यांना कळते.

गुंतवणुकीसाठी अॅप काही अॅप्स पैसे दुप्पट करण्याचा दावा करतात. तुम्ही यामध्ये लहान ते मोठ्या रकमेपर्यंत गुंतवणूक करू शकता. सुरुवातीला १० रुपये गुंतवल्यानंतर पैसे वाढत जातात तशी आणखी पैसे कमावण्याची हाव वाढत जाते. मग व्यक्ती मोठी रक्कम गुंतवायला लागते आणि जसजशी रक्कम वाढते तसा आलेख खाली येतो आणि सगळे पैसे बुडतात.

टीम मधुरिमा

बातम्या आणखी आहेत...