आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायमन सिनेक यांच्या “स्टार्ट विथ व्हाय” या पुस्तकात असे सांगितले आहे की, प्रत्येक यश-कथेमागे एक प्रेरणादायक कथा असते. महान नेते किंवा नवोन्मेषी असतात, ते एका पद्धतीचा अवलंब करून त्या स्थानापर्यंत पोहोचतात, ज्याची गुरुकिल्ली प्रेरणा असते.
गोल्डन सर्कल समजून घ्या गोल्डन सर्कल किंवा सोनेरी वर्तुळ का फॅक्टरपासून सुरू होते, कसे फॅक्टरच्या अंमलबजावणीसह पुढे जाते आणि नंतर व्हॉट फॅक्टरपर्यंत पोहोचते, ते अंतिम उत्पादन आहे. आपण एखाद्या कंपनीच्या दृष्टिकोनातून या सोनेरी वर्तुळाबद्दल बोललो, तर तिच्या अस्तित्वाचा हेतू काय असेल, त्याचे कार्य कसे असेल आणि उत्पादन-मूल्याचा अर्थ काय असेल. यशस्वी लोक नेहमी चौकटीच्या बाहेर विचार करतात आणि ते त्यांच्या विशिष्ट विचारसरणीच्या आधारे तसे करण्यास सक्षम असतात. अनेकदा तुम्हाला त्यांच्या विचार प्रक्रियेत हे सोनेरी वर्तुळ आढळेल, जे त्यांना अधिक चांगले विश्लेषण करण्यास सक्षम करते.
प्रेरणा देण्याचे महत्त्व लोकांना कामावर आणण्याचे किंवा त्यांना तुमचे उत्पादन विकण्याचे दोन मार्ग आहेत - इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा, मॅनिप्युलेशन म्हणजेच दबाव किंवा हुशारीचा वापर. बहुतांश लोक मॅनिप्युलेशनचा अवलंब करतात आणि त्या बदल्यात ते शक्यतांचा पूर्णपणे फायदा घेऊ शकत नाहीत. एखाद्याला प्रेरणा दिली तर तुम्ही त्यांना अधिक सर्जनशील किंवा सहभागी बनवाल व ती एक चांगली परिस्थिती असेल.
नेतृत्वाचे रहस्य भूतकाळात डोकावल्यास दिसल की, प्रेरणा देणारी महान व्यक्तिमत्त्वेच सर्वात यशस्वी ठरली. दुसरीकडे, काही लोकांनी दबाव किंवा चतुराईच्या मॅनिप्युलेटिव्ह तंत्राचा वापर केला आणि त्यांना मध्यम यश मिळाले. मोठ्या यशासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लोकांना जोडावे लागेल आणि हे केवळ प्रेरक संदेश, मास-कनेक्ट, चांगल्या इमेजनेच शक्य आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.