आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तान आपल्याबरोबरच स्वतंत्र झाला, पण त्याने इस्लामिक राष्ट्र होण्याचा मार्ग स्वीकारला, तर स्वाभाविकपणे आपण आपल्या लोकशाहीच्या मूलभूत घटकांचा केवळ राज्यकारभारातच नव्हे, तर जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये स्वीकार करू लागलो. लोकशाहीत विकासाची सुरुवातीची गती मंद असली तरी असा विकास मजबूत असतो. आज पाकिस्तान दहशतवादाचे आश्रयस्थान झाला आहे आणि तो आपल्याच लोकांशी लढत आहे. देशातील कर्ज-जीडीपी गुणोत्तर ९०% पर्यंत गेले आहे आणि परकीय चलन ४.५ अब्ज डाॅलर म्हणजेच दोन आठवड्यांच्या आयातीएवढेच शिल्लक आहे. आयएमएफने कर्ज देण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेतील परिस्थिती आपण पाहिली.
शेजारील नेपाळ विकासाच्या नावाखाली शून्य आहे. चीन बनावट आकडे देऊन जगाला आपली ताकद दाखवत असला तरी आता त्याच्या आकड्यांवर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे अर्थतज्ज्ञांना वाटू लागले आहे. कोरोनाच्या ताज्या हल्ल्याने त्याच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा पर्दाफाश केला. चीनची लोकशाही हा एक भ्रम आहे आणि प्रत्यक्षात साम्यवादाच्या नावाखाली राज्यकर्त्यांनी जनतेचा आवाज दाबला आहे. म्हणजेच विकास झाला असला तरी बहुधा आता त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. संविधान बदलून स्वतःला आयुष्यभर सत्तेत ठेवण्याची शी जिनपिंग यांची चाल भविष्यातील बंडखोरीचे लक्षण आहे. या उदाहरणांतून एकच धडा मिळतो की, आपण आपली लोकशाही आणखी मजबूत केली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.