आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:कठपुतळी होणे टाळले पाहिजे

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदल होतच असतात. त्यामुळे कथा-प्रवचनाच्या क्षेत्रातही नवे वळण आले आहे. हे क्षेत्र त्याच्या विचारांसाठी प्रसिद्ध होते आणि आता ते चमत्कारांसाठी चर्चेत आहे. जो विषय पूर्वी भावनेचा होता, त्याचा मापदंड आता गर्दी झाला. गर्दी पाहताच राजकारण्यांचा सूर बदलतो. येणारा काळ तमाशांचा असेल. लोकशाहीत निवडणूक हे एक अनुष्ठान असावे, पण काही लोक त्याला तमाशा बनवतात व तमासगीर प्रत्येक गोष्टीचा उपयोग करून घेतात. त्यामुळे कथा-प्रवचन हेही आता निवडणुकीचे हत्यार होईल. चमत्काराला नमस्कार कोण करत नाही? त्यामुळेच आता ना कुणाला दोष देता येणार, ना कुणाची स्तुती करता येणार. आपली रुची कशात आहे? त्यानुसार भविष्यात सर्वकाही वापरा. आणि वापरायची समज नसेल तर ती गोष्ट तुमचा गैरवापर करायला तयार आहे. म्हणूनच तमाशाच्या येणाऱ्या युगात कठपुतळी होणे टाळा. आपल्या धर्मावर पूर्ण श्रद्धा ठेवा, पण दुसऱ्याचा धर्म दुखवू नका. असेच जीवन देवाला आवडते.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta