आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Being Gender Neutral Will Also Develop Intellectual Consciousness| Article By Jyotiranjan Pathak

यंग इंडिया:लिंगनिरपेक्ष राहिल्याने बौद्धिक चेतनाही विकसित होईल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही गोष्टीत बदल हा काळ आणि परिस्थितीनुसार होत असतो. हा बदल कसा होईल, समाजावर त्याचे काय परिणाम होतील, हे नेहमीच भविष्याच्या गर्भात दडलेले असते, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, बदलामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा समावेश असतो. केरळमधील लोअर प्रायमरी स्कूलच्या विविधतेने संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले आहे. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील वलयानचिरंगारा सरकारी शाळेने मुले-मुली दोघांसाठी लिंगनिरपेक्ष गणवेश स्वीकारून लैंगिक समानता प्रणाली मजबूत करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे.

या निर्णयाकडे सामाजिक क्रांती म्हणून पाहिले जात आहे. त्याचे फायदे येत्या काळात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळू शकतात. वास्तविक चार वर्षांपूर्वी २०१७ मध्येच पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी याची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या काही काळापासून सोशल मीडियासह इतर प्लॅटफॉर्मवरून लिंगनिरपेक्ष राहण्याची मागणी केली जात आहे. बुद्धिजीवी समाज अनेक दिवसांपासून याची मागणी करत होता. जागतिक संदर्भात, मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) क्रिकेटमधील लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी त्याच्याशी संबंधित काही संज्ञांमध्ये बदल करण्याचे समर्थन केले आहे. उदा. बॅट्समन, बॅट्सवुमन ऐवजी बॅटर हा शब्द वापरावा. यापूर्वी जेंडर न्यूट्रल क्लासरूम, जेंडर न्यूट्रल टॉयलेट, जेंडर न्यूट्रल ऑफिस आदी मागण्या होत्या. आता हळूहळू जेंडर न्यूट्रल शब्दांनाही सामाजिक मान्यता मिळत आहे. २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर समुदायाला समाजाचा एक महत्त्वाचा भाग मानून त्यांना ‘तृतीयपंथा’चा दर्जा दिला. यासोबतच समाजातील बुद्धिजीवी वर्गाकडून जेंडर न्यूट्रल असे शब्द वापरण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की, उद्या एखाद्या ट्रान्सजेंडरची पोलिसांत नियुक्ती झाली तर त्याला काय संबोधले जाईल – पोलिस पुरुष की पोलिस महिला? संभ्रम निर्माण होईल. म्हणून, लिंगनिरपेक्ष शब्द वापरणे चांगले होईल, जेणेकरून समाजातील सर्वसमावेशक विकासास अडथळा आणणारी लैंगिक असमानता दूर करून सर्व वर्गांचा सहभाग सुनिश्चित करता येईल.

२००५ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ हे लिंग-तटस्थ लिंग गृहनिर्माण पर्याय ऑफर करणारे अमेरिकेतील पहिले सार्वजनिक विद्यापीठ ठरले. २००८ मध्ये तटस्थ शब्दांसह बहुभाषिक निर्देशिका स्वीकारणारी युरोपियन युनियन पहिली आंतरराष्ट्रीय संस्था बनली. केरळमधील शाळेने ज्या प्रकारे लैंगिक समानता आणि मुलींना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन लिंगनिरपेक्ष गणवेश स्वीकारला आहे, ते स्वागतार्ह आहे. आधुनिक भारतात बदलासाठी लिंगनिरपेक्ष ड्रेस, जेंडर न्यूट्रल ऑफिस किंवा टॉयलेट या शब्दांचा विचार करणे आवश्यक आहे. मात्र, त्यातही अडचणी आहेत. लिंगनिरपेक्ष राहिल्याने समाजव्यवस्था कोलमडून पडेल, असा युक्तिवाद दुष्ट मानसिकतेच्या बाजूनेही केला जाईल, पण बदलत्या सामाजिक वातावरणात बदल स्वीकारले पाहिजेत. यामुळे सामाजिक आणि लैंगिक समानतेसह बौद्धिक चेतनेचा विकासही होईल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

ज्योतिरंजन पाठक तरुण लेखक jyotikumar151986@gmail.com

बातम्या आणखी आहेत...