आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:एकमेकांबद्दल कृतज्ञ राहिल्याने सद्भाव पसरतो

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगल्या सवयी, वर्तन, विचार आणि वाणी यांचाही प्रसार होतो. राम तेच करत होते. अयोध्येला आल्यावर त्यांनी आपल्या मित्रांना बोलावून त्यांचे गुरू वसिष्ठांना भेटायला सांगितले. रामाच्या साथीदारांमध्ये वानर होते, बिभीषण आणि त्याचे सैन्य हे मुख्य होते. राजवाड्यातील धर्मसत्तेतील प्रमुख लोकांशी कसे वागावे हे वानरांना माहीत नव्हते, म्हणून रामाने त्यांना शिकवले. पण, त्याच वेळी रामाला वाटले की गुरू वसिष्ठांच्या मनात अजूनही वानरांबद्दल काही वेगळ्या भावना आहेत, म्हणून लगेचच त्यांनी आपल्या मित्रांची ओळख करून दिली - ‘ए सब सखा सुनहु मुनि मेरे। भए समर सागर कहं बेरे।’ ऐका मुनी, हे सगळे माझे मित्र आहेत. त्यांनी माझ्यासाठी युद्धाच्या समुद्रात जहाजासारखी भूमिका बजावली. माझ्या हितासाठी त्यांनी प्राणही दिला. हे मला भरतापेक्षा अधिक प्रिय आहेत. कोणी कोणासाठी काही केले असेल तर किमान कृतज्ञता तरी परत द्यावी म्हणून राम हे बोलत होते. रामाला ही सवय समाजात रुजवायची होती की आपण एकमेकांबद्दल कृतज्ञ झालो व ही भावना प्रत्येकात पसरली की आपल्यासाठी कोणी छोटे काम केले तरी आपण लगेच त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे किंवा त्याच्यासाठी काही तरी केले पाहिजे. त्यामुळे समाजात एकोपा निर्माण होतो. एकमेकांना मदत करण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन दिले जाते.

पं. विजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...