आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:आनंदी राहणे ही आपली निवड

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडण्याची सवय मनुष्य आणि प्राणी दोघांमध्ये आहे. माणसाकडे बुद्धी, विवेक असल्याने निवड होण्याची शक्यता जास्त आणि प्राण्यांत कमी असते. शास्त्रज्ञांनी कुत्र्यांवर प्रयोग केले. रोज आधी बेल वाजवली जायची, मग भाकरी दिली जायची. काही वेळाने बेल वाजली आणि भाकरी दिली नाही, तेव्हा कुत्र्याची लाळ टपकू लागली. परिस्थिती आपण निवडतो. कोणी शिवीगाळ केली की आपल्याला राग यायचा. आपण आनंद निवडला तर अपमानास्पद शब्दांचा आपल्यावर परिणाम होणार नाही. म्हणून आपल्या निवडीबद्दल जागरूक राहा. नाराज होणे, आनंदी राहणे ही आपली निवड आहे. त्यामुळे आपल्याला एखादे पद निवडायचे असते तेव्हा आपल्यासाठी काय योग्य, फायदेशीर आहे याचा विचार करा. आपण निवडत असलेल्या स्थितीने किती नुकसान होऊ शकते, याबाबत जागरूक राहा. आपली निवड योग्य असेल तर आपण ज्या वाटेवर जातो ती आपल्या पावलांच्या आवाजाने हसते. जी परिस्थिती आपण निवडतो, तसेच होतो.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...