आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वात वाईट काय होईल?
अज्ञाताची भीती आपल्याला स्वतःसाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून रोखते. तर सत्य असे आहे की, ज्या गोष्टीची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते तीच गोष्ट आपल्याला करायची गरज असते. आपण स्वतःला विचारले पाहिजे की, मी हे केले तर सर्वात वाईट काय होऊ शकते? आणि मग त्याचे परिणाम स्वीकारून ते करावे.
खुलेपणाने सामान करा
एखाद्या व्यक्तीच्या यशाचे यावरून मोजमाप करता येते की, त्याने अस्वस्थ चर्चा कितीदा टाळल्या नाहीत, त्याला घाबरवणाऱ्या गोष्टींचा त्याने किती मोकळेपणाने सामना केला? तथापि, वेगळ्या वाटेवर चालण्यासाठी किती खर्च येतो? काहीच नाही. सर्वात वाईटाचा विचार करून सर्वोत्तमाची अपेक्षा केली तर यशस्वी व्हाल.
अनुकूलतेची वाट वाहू नका
योग्य वेळेचा वाट पाहू नका. वेळ कधीही पूर्णपणे योग्य होत नसते. परिस्थिती अनेकदा प्रतिकूल असेल. एखाद्या दिवशी काही चांगले घडेल, असा विचार करणे हा एक भ्रम आहे आणि तो तुमचे नुकसान करतो. अशा प्रकारे तुम्ही तुमची स्वप्ने कधीच पूर्ण करू शकणार नाही. जितके तुम्ही स्वतःसाठी कम्फर्ट शोधाल तितके ध्येय साध्य करण्यापासून मागे जाल.
चांगल्या गोष्टींवर फोकस
काम करण्याचा पर्याय हा जीवनासाठी सतत काम करण्याइतकाच महत्त्वाचा आहे. तुमच्या परिणामकारकतेच्या शिखरावर काम करता तेव्हा तुम्ही अधिक उत्पादक असता. याचा अर्थ असा की, कमी अर्थपूर्ण गोष्टी करणे टाळले तर तुम्ही आळशी नाहीत, तुम्हाला फक्त चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
परफेक्शनचा खरा अर्थ
अधिकाधिक गोष्टी मिळवणे हा परफेक्शनचा अर्थ नाही. परफेक्शन म्हणजे काही हटवण्यास वाव नसल्याच्या स्थिती येणे. जीवनात अनेक गोष्टी अनावश्यक असतात. त्यात व्यग्र राहणे हा एक प्रकारचा आळस आहे. अनेक गोष्टींनी वेढलेले असणे हे काहीही न करण्याइतकेच अनुत्पादक आहे.
कमी काम, अधिक फळ
हुशारीने काम करा. कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त फळ कसे मिळवायचे याची कला शिका. एखादी गोष्ट फक्त फायद्यासाठी करू नका, नेहमी तुमचे प्रयत्न शक्य तितके फलदायी करण्यावर लक्ष केंद्रित करा. महत्त्वाची कामे पुढे ढकलण्याची सबब सांगण्याऐवजी ती आधी करण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी नंतर करता येतील त्यात स्वतःला अडकवू नका.
टिमोथी फेरिस यांचे “द ४-अवर वर्क वीक” हे पुस्तक शीर्षकातूनच त्याचा उद्देश सांगते. कमीत कमी कामातून जास्तीत जास्त फळ कसे मिळवायचे आणि स्मार्ट-वर्किंग कसे करायचे हे शिकवणारे हे पुस्तक प्रथम क्रमांकाचे न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलर ठरले होते.
स्वत:ला कधीही कमी लेखू नका
मनुष्य स्वतःला सर्वात जास्त भ्रमात ठेवतो, कारण असे करणे सर्वात सोपे आहे. पण हे सरळ पाऊल उचलू नका. तुम्ही एकटेच असुरक्षित नाही. स्पर्धेला जास्त महत्त्व देऊ नका आणि स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही स्वतःला समजता त्यापेक्षा खूप चांगले आहात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.