आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:मोठी असो किंवा छोटी, चूक ही केवळ चूकच असते

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२९ सप्टेंबर २०१८ रोजी रमाणीबाई (३६) आणि सुजाता (३१) या ऑटोमध्ये बसल्या होत्या, तो आॅटो राजू (३६) चालवत होता. रमाणी आणि सुजाता गरम सांबाराने भरलेली दोन भांडी घेऊन चेन्नईतील अम्मा उन्नावगम येथे जात होत्या. हे अनुदानित फूड कँटीन तामिळनाडू सरकार चालवते. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी हे कँटीन सुरू केले तेव्हापासून त्या हे काम करत आहेत. यात गैर काय, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर मी म्हणेन की, अन्नपदार्थ कँटीनपर्यंत नेणारा ऑटोचालक त्यांच्या वाहनात व्यावसायिक खाद्यपदार्थ घेऊन जात होता, त्याचा परवाना त्याच्याकडे नसल्याने कायद्याच्या दृष्टीने ते चुकीचे होते. वाहनाला फक्त प्रवासी आणि त्यांचे वैयक्तिक सामान वाहून नेण्याची परवानगी होती. येथे वैयक्तिक सामान हा शब्द लक्षात ठेवा. वरील प्रकरणात वैयक्तिक सामान म्हणजे गरम सांबाराने भरलेली दोन मोठी भांडी होती. मला माहीत आहे, तुम्ही म्हणाल, मग काय झाले? यामुळे कोणाचे नुकसान होते? पोलिस सांबार घेऊन जाणाऱ्या लोकांना केव्हापासून पकडू लागले? कोणताही कायदेशीर व्यवसाय करणे गुन्हा आहे का? ते काही ड्रग्ज विकत आहेत का? या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी त्या दिवशी काय घडले ते प्रथम जाणून घेऊया. खाद्यपदार्थ नेत असताना बेदरकारपणे गाडी चालवण्याची ख्याती असलेला दुसरा रिक्षाचालक शेखर (५१) याने राजूच्या ऑटो रिक्षाला धडक दिली. रिक्षाचे मोठे नुकसान झाले नाही, पण गरम सांबारने भरलेला संपूर्ण ड्रम उलटला आणि तो घेऊन जाणाऱ्या दोन्ही महिला होरपळल्या. सुजाताला किरकोळ दुखापत झाली, तर रमाणीबाई गंभीर भाजल्या गेल्या. हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. या महिन्याच्या सुरुवातीला चेन्नईचे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट पी. चंद्रशेखर यांनी राजू या ऑटो चालकाला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. राजूवर अनियंत्रित वेगाने गाडी चालवल्याचा आणि परमिटशिवाय प्रवासी वाहनातून खाद्यपदार्थ नेल्याचा आरोप होता. दुसऱ्या ऑटोचा ड्रायव्हर शेखर याला रॅश ड्रायव्हिंग केल्याबद्दल सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. चालकांचा निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असल्याचे न्यायदंडाधिकारी म्हणाले. प्रवासी वाहनात राजू व्यापारी माल समजले जाणारे गरम अन्न घेऊन जात होता.

भारतात ही धक्कादायक बाब नसली तरी राजूला ही चूक असल्याचे कधीच वाटले नाही. अशा किरकोळ चुकांचे आणखी एक उदाहरण पाहा. माझ्या पिढीच्या पालकांच्या आजच्या चिंतांपैकी एक म्हणजे मुले रात्री उशिरा मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये फिरणे किंवा पबमध्ये जाणे. आपण मुलांना रात्री उशिरा बाहेर जाण्यास नाही म्हणतो तेव्हा ते म्हणतात की, काहीही होणार नाही किंवा ही जुनी विचारसरणी आहे. मी या पिढीला सांगू इच्छितो की, आम्ही जुन्या पद्धतीचे नाही, कायद्याची पर्वा न करणाऱ्या आणि सर्वसामान्य प्रवाशांना अडचणीत टाकणाऱ्या लोकांमुळे आम्ही चिंतेत आहोत. तुमचे नशीब वाईट असेल तर तुम्हाला त्यांच्या चुकीचा फटका सहन करावा लागू शकतो. ८३% अपघात रात्री ९ ते पहाटे ५ दरम्यान होतात.

फंडा असा ः कोणत्याही कायद्यानुसार गुन्हेगारी किंवा दंडनीय समजल्या जाणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्यामुळे तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी फायदा होणार नाही.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...