आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट भाष्य:भाजपला आता कुठल्याही कुबड्यांची गरज नाही

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या संस्थापकांना कधीच बहुमत मिळू शकले नाही. बहुरंगी युतींना एकत्र ठेवण्याची कसरत त्यांना पार पाडावी लागली. आज मोदी-शहा यांच्यामुळे त्यांना कोणत्याही मित्रपक्षाच्या कुबड्यांची गरज राहिली नाही, तेव्हा त्यांनी आपल्या जुन्या नेत्यांचे आभार मानले पाहिजेत. भाजपच्या वर्धापनदिनाला त्याचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुनर्जन्म दिन म्हणतात, विशेषत: त्याची स्थापना १९८० मध्ये ईस्टर वीकेंडला झाली होती. आज भारतीय राजकारण ज्या पक्षाभोवती फिरत आहे त्या पक्षाबद्दल भाजपच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त बरेच काही लिहिले गेले आहे. विशेष म्हणजे या पक्षाचे सलग दुसऱ्यांदा आलेले सरकार शेवटच्या वर्षात पदार्पण करत आहे. पुढील वर्षी याच काळात मतदानाची दोन आवर्तने पूर्ण झालेली असतील. आज भाजप जवळपास अजेय आहे. जनता पक्षाच्या राखेतून उठलेला हा पक्ष आहे. त्याने खूप विकास केला आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेल्या या ४३ वर्षांच्या पक्षाशी या पक्षाचे किती साम्य आहे आणि त्यात किती बदल झाला आहे हे समजून घेण्याची आज चांगली संधी आहे. पहिली गोष्ट, जी बदललेली नाही ती म्हणजे त्याची वैचारिक संलग्नता. त्याचे संस्थापक संघाच्या विचारसरणीशी जवळजवळ बांधील राहिले. एनडीए-२ च्या काळात मोदी-शहा टीमप्रमाणेच त्यांनी बाहेरील प्रतिभांचा भरपूर सहभाग घेतला असला तरी पक्षाचे सर्व प्रमुख नेते एकाच वैचारिक शाळेतून आले होते. त्यात पक्षाचे सर्व अध्यक्ष, मुख्य सरचिटणीस आणि जवळपास सर्व प्रदेशाध्यक्षांचा समावेश आहे. नेतृत्वही संघाच्या विचारसरणीशी तितकेच कटिबद्ध राहिले. बरेच फरकदेखील होते, आपण असेही म्हणू शकता की ते आकडेवारीची वास्तविकताही प्रतिबिंबित करते. याचे कारण म्हणजे संस्थापकांना कधीच बहुमत मिळाले नाही. विविध युती एकत्र ठेवण्याच्या गरजेतून त्यांना त्यांच्या विचारसरणीतील काही मुख्य घटक बाजूला ठेवण्यास भाग पाडले होते, त्यात काश्मीर, राम मंदिर किंवा समान नागरी कायदा हे प्रमुख मुद्दे होते. त्याच्या वारसांनी बहुमत मिळवले आणि यापैकी पहिल्या दोन बाबींवर त्वरित कार्यवाही केली. तिसरा मुद्दा अत्यंत बारकाईने राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिहेरी तलाकच्या प्रथेवर बंदी घालून त्याची सुरुवात केली आहे आणि तुम्ही खात्री बाळगू शकता की, लग्नासाठी किमान वय निश्चित करण्यासाठी आणि बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यासाठी पावले उचलली जातील. १९७७ च्या जनता पक्षाच्या प्रयोगात हरवलेल्या वैचारिकदृष्ट्या बांधील पक्षाला त्याच्या संस्थापकांनी पुनरुज्जीवित केले, हे प्रशंसनीय आहे. भारतीय जनसंघ, ​​भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ), समाजवादी पक्ष, चरणसिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय लोकदल आणि बाबू जगजीवन राम यांच्या काँग्रेस फाॅर डेमोक्रसी या पाच प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. यापैकी केवळ एकच पक्ष टिकला, एवढेच नाही, तर नव्या अवतारात उदयास आला. तो पक्ष होता भाजप. बाकीचे विखुरले आणि काही तर समाजवादी पक्ष (मुलायम) आणि आरजेडी (लालू) सारखे राज्य-केंद्रित, जातकेंद्रित (जनता दलाप्रमाणे) राहिले. जॉर्ज फर्नांडिस आणि आता नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी कालांतराने बिहारपर्यंत मर्यादित राहिले. यापैकी भाजपने आज ज्या प्रकारे स्वतःला उभे केले आहे आणि आज राज्य करत आहे, त्याचे दुसरे उदाहरण आपल्या इतिहासात सापडणार नाही, इंदिरा गांधींच्या उत्कर्षकाळातही नाही. विचारसरणीची स्पष्टता हेच प्रमुख कारण होते, त्यामुळे जनसंघाचा निर्दोष भाजप म्हणून पुनर्जन्म झाला. एकीकडे विचारधारा एवढी प्रभावी होती, तर दुसरीकडे इतरांशी हातमिळवणी करण्यातही ती अडसर ठरली. हे भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान होते. आणि आज मोदी आणि शहा इतके यशस्वी असताना त्यांनी त्यांच्या संस्थापकांचे, विशेषत: वाजपेयींचे आभार मानले पाहिजेत की, त्यांनी भाजपला विरोधी छावणीतील अस्पृश्यतेपासून मुक्त केले. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व्ही.पी. सिंग सरकारला समर्थन देणे, हे त्यांचे मोठे पाऊल होते. या राजकीय पावलाचे पुरेशी प्रशंसा झाली नाही, परंतु वैचारिकदृष्ट्या गैरसोयीच्या, डावीकडे झुकलेल्या युतीला भाजपने दिलेल्या पाठिंब्याने त्याला त्याच्या अस्पृश्य या स्थितीतून मुक्त करण्यास सुरुवात केली होती. हे काँग्रेसला कमकुवत आणि सत्तेपासून दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्यावहारिक राजकारणही होते. हे किती मोठे आव्हान आहे, हे नंतर काँग्रेसला सत्तेत येण्यास मदत करणाऱ्या भाजपविरोधी आघाड्यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर (१९९०-९१) पासून ते एच.डी. देवेगौडा (१९९६-९७) आणि आय.के. गुजराल (१९९७-९८) पर्यंत ‘सेक्युलर’ शक्तींना एकत्र ठेवण्यासाठी आणि ‘कम्युनल’ शक्तींना बाहेर ठेवण्यासाठी त्या स्थापन केल्या गेल्या होत्या, या आधारावर सर्व आघाड्यांचे समर्थन करणे सोपे होते. अडवाणी आणि वाजपेयी यांनी यापैकी काही शक्तींशी नंतर संबंध जोडणे हे त्याहून मोठे यश होते. ४३व्या वर्षात भाजप वैचारिक सातत्य आणि राजकीय शैलीत बदल करत विकासाकडे वाटचाल करत आहे. तुम्हाला ते आवडेल की नाही हे तुम्ही कोणत्या पार्श्वभूमीतून आला आहात यावर अवलंबून आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta