आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Bollywood Has Forgotten That The Internet Remembers Everything | Article By Kaweri Bamjai

चित्रपट:इंटरनेट सर्व काही लक्षात ठेवते याचे बाॅलीवू़डला झाले विस्मरण

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे एक दशकापूर्वी सोशल मीडिया नवीन होता तेव्हा मला कोणी तरी सांगितले की, ट्विटर ही नेटवर्किंग नव्हे, एक गुन्हेगारी साइट आहे. याच काळात ट्विट सेव्ह करण्याचा, हटवलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट्स घेणे आणि भविष्यातील वापरासाठी क्लिप आणि रेकॉर्डिंग संग्रहित करण्याचा ट्रेंड उदयास आला. बॉलीवूड आपल्याच दुनियेत रमले होते. भविष्यात काय होणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. जगाच्या प्रश्नांवर त्यांनी आपली अनफिल्टर्ड मते जाहीरपणे मांडली. पत्नी किरण रावला देशात असुरक्षित वाटते, असे आमिर खानचे म्हणणे असो किंवा धार्मिक विधींमध्ये दुधाचा गैरवापर होतो, असे अक्षय कुमारचे म्हणणे असो - इंटरनेट काहीही विसरत नाही. कोणत्या स्टारने कोणत्या विषयावर, विशेषत: सुशांतसिंह राजपूतच्या कथित आत्महत्येप्रकरणी स्टार्सनी घेतलेली भूमिका, कोणत्या विषयावर कधी मौन पाळले होते हेदेखील इंटरनेटला चांगले आठवते.

मग त्यात लॉकडाऊनचा टप्पा आणि ओटीटीचा काळ जोडा. पुढे उत्तर भारताला दक्षिण भारतातील साध्या आणि मर्दानी नायकांची ओळख झाली. दक्षिणेतील नायिका सशक्त असूनही पारंपरिक होत्या आणि त्यांच्या कथांचे मूळ त्यांच्या देशात व समाजात होते. अशा परिस्थितीत बॉलीवूडचे बडे स्टार्स आता बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहेत यात आश्चर्य वाटायला नको. आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटातील दृश्ये आणि भारतात असुरक्षित असल्याचं त्याचं वक्तव्य ट्विटर व व्हॉट्सअॅपवर इतकं पसरलं आहे की, त्याने देशाला प्रेमपत्र लिहून त्यात मन ओतलं तरी प्रेक्षकांच्या मनावर त्याचा परिणाम होणार नाही. अक्षय कुमार स्वच्छ भारत ते महिलांच्या स्वच्छतेपर्यंतच्या मोहिमेशी निगडित होता आणि त्याला किमान बहिष्कार-संस्कृतीला सामोरे जावे लागणार नाही असे वाटत होते. रक्षाबंधन या चित्रपटात त्याने ओमचे लॉकेट परिधान करून सम्राट पृथ्वीराज यांच्यावर चित्रपट बनवला होता, मात्र प्रेक्षक त्याच्यावरही नाराज झाले आहेत. कंगना रणौतही सुटली नाही आणि तिचा ‘धाकड’ आपटला.

तुमचे काम दाक्षिणात्य सिनेतारकांसारखे बोलले तरच आम्ही तुमचा चित्रपट पाहू, असा स्पष्ट संदेश प्रेक्षकांकडून दिला जात आहे. तुमचे वैयक्तिक आणि राजकीय विचार तुमच्या कामातून व्यक्त करणे चांगले राहील. मात्र, लालसिंग चढ्ढामध्येही तेच झाले आहे. यात अतुल्य भारतचा प्रचार आणि आपल्या निकट भूतकाळाचे तपशीलदेखील आहेत. १९७७ मध्ये आणीबाणीच्या समाप्तीपासून या चित्रपटाची सुरुवात होते आणि त्यात लालसिंगचा सामना अनेक वास्तविक पात्रांशी होतो, त्यात लालकृष्ण अडवाणी, के.आर. नारायणन आणि तरुण शाहरुख खान हेही समाविष्ट आहेत. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीही या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. कारगिलच्या लढाईपासून ते रामलीला मैदानावरील अण्णा हजारे यांच्या उपोषणापर्यंत लालसिंग चढ्ढा भारताच्या इतिहासातून पुढे जात राहतो.

चित्रपटातील एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले, त्यामध्ये लालसिंग देशभराचा प्रवास धावत करतो आणि चार वर्षे सतत धावल्यानंतर अचानक एक दिवस थांबतो. त्याने धावणे का थांबवले असे विचारले असता, गंभीर तात्त्विक उत्तर देण्याऐवजी तो म्हणतो : थकलोय, घरी जायचा आहे. आपण एक दिवस लालसिंग चढ्ढा, दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आणि त्यानंतर लगेच येणाऱ्या पठाणवर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण स्वतःला विचारायला हवे की, ज्या कलाकारांनी आपल्या आयुष्यात इतका आनंद आणला आहे, त्यांनी चित्रपट बनवणे बंद केले तर काय होईल? त्यामुळे आपण सांस्कृतिकदृष्ट्या अधिक गरीब होणार नाही का? आणि खरोखरच त्यांच्यासाठी अपशब्द वापरण्याची गरज आहे का? ते परोपकारी नाहीत, तर केवळ चित्रपट अभिनेते आहेत. ते आपल्या सुख-दुःखाचा व्यापार करतात आणि आपण ज्या काळात जगत आहोत त्याचे चित्रण ते त्यांच्या चित्रपटांमध्ये करतात. या कॅन्सल संस्कृतीच्या या युगात या ताऱ्यांचे भवितव्य ठरवण्याची ताकद आपल्यात आहे, पण त्यांना मातीत मिसळून कोणता आनंद मिळणार आहे, याचा विचार करायला हवा. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) कावेरी बामजई पत्रकार आणि लेखिका kavereeb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...