आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Bollywood Needs A Twist In The Story Right Now... | Article By Kaweri Bamjai

बॉलीवूडला कथेत ट्विस्ट आणण्याची गरज:बॉलीवूडला सध्या कथेत ट्विस्ट आणण्याची गरज...

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच कान्स सिने महोत्सव पार पडला. त्यात जगातील उत्कृष्ट चित्रपटांची निवड झाली. एक ३६ वर्षाची अभिनेत्री एका गाण्यात किशोरवयीनाप्रमाणे नाचते आहे. एक ५७ वर्षाचा सुपरस्टार आपल्या अर्ध्या वयाच्या अभिनेत्यांप्रमाणे आपली छाती आणि स्नायू दाखवत आहे. या दोघांचे ते गाणे स्पेनमध्ये शूट करण्यात आले. ते ‘वॉर’ चित्रपटाच्या गाण्याची नक्कल वाटतेय. जे याच दिग्दर्शक आणि याच प्राॅडक्शन हाऊसने तीन वर्षांपूर्वी चित्रित केले होते. या तीन वर्षांत खूप काही बदलले आहे. जागतिक महामारी आली, युरोपात युद्ध झाले आणि आउटसायडर्ससह बॉलीवूडलाही वाईट वागणुकीमुळे देशव्यापी बहिष्काराचा सामना करावा लागला. मात्र या सर्वांचा मुंबई सिने उद्योगावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी असेच चित्रपट बनवणे सुरू ठेवले आहे. यातून गर्दीचे मनोरंजन होईल, असे त्यांना वाटत असावे. लोकांना काय हवं आहे, ते त्यांना माहीत अाहे. तरीदेखील ते ‘लाल सिंह चड्ढा’ असो की, ‘सम्राट पृथ्वीराज’, हे मोठ्या स्टारचे तेच जुने कथानक असणारे चित्रपट आहेत. जे बॉक्स ऑफिसवर आपटले.

बॉलीवूड दक्षिणेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे, त्याने ‘ब्रह्मास्त्र’ व ‘शमशेरा’ बनवले मात्र हे चित्रपटदेखील चालले नाहीत. तर हे गाणे ‘पठान’ नावाच्या चित्रपटातील आहे, यातून शाहरुख खान माेठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तो बॉलीवूडला वाचवणार का? विशेषत: जेव्हा देशांतर्गत बाजारपेठेत, २०२२ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या दहा चित्रपटांमध्ये फक्त चार हिंदी चित्रपटांचा समावेश आहे आणि दक्षिण भारतीय चित्रपट पहिल्या पाच स्थानांवर आहेत. या चार हिंदी चित्रपटांपैकी एक मल्याळम चित्रपटाचा रिमेकही आहे! मात्र नव्या वर्षात शाहरुखचे कमीत कमी तीन चित्रपट रिलीज होतील. ‘पठान’च्या व्यतिरिक्त तामिळ दिग्दर्शक एटलीचा ‘जवान’ आणि राजकुमार हिराणीचा ‘डंकी’. सलमान खानचेदेखील दोन चित्रपट. ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर-३’ येणार आहेत. तो ‘पठान’मध्येही दिसणार आहे. ‘पठान’ आणि ‘टायगर-३’चे निर्माते यशराज फिल्म्स आहेत, ते मार्व्हला टक्कर देण्यासाठी अॅक्शन फ्रँचायझी आणणार आहेत. चित्रपट मारधाड आणि शानदार लोकेशनमध्ये शूूट झालेल्या महागड्या आयटम साँगमुळे चालतीलही, मात्र ते पाहिल्यासारखेच वाटेल. असचं काही तरी यशराजच्या ‘धूम’ सिरीमध्येही होते. डीसी स्टुडिओजला कळले की, हा सर्व कमी कमाईचा खेळ आहे आणि याचे नवे सह-सीईओ जेम्स गन व पीटर सफ्रानला ‘ब्लॅक एडम’ आणि ‘मॅन ऑफ स्टील’च्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांना रद्द करावे लागले. मोठे बजेट, मोठे स्टारचे मानधन आणि महागडे स्पेशल इफेक्ट्स हळूहळू अॅक्शन फ्रँचायझी नष्ट करत आहेत. २०२३ मध्ये येणाऱ्या इतर मोठ्या हिंदीच्या चित्रपटातही दक्षिण चित्रपटातील रिमेक आणि बायोपिकचा समावेश आहे. त्यात दक्षिणेच्या रिमेकमध्ये ‘शहजादा’ (कार्तिक आर्यन, ‘अला वँकुण्ठपुररामुलू’च्या रिमेकमध्ये अल्लू अर्जुनच्या भूमिकेत आहे) आणि ‘सेल्फी’ (अक्षय कुमार, पृथ्वीराज सुकुमारनचा चित्रपट ‘ड्रायविंग लायसेन्स’च्या रिमेकमध्ये)चा समावेश आहे. दुसरीकडे, बायोपिकमध्ये अजय देवगणच्या ‘मैदान’ आणि अक्षय कुमारच्या ‘सुरारई पोत्तूरू’च्या हिंदी रिमेक आहे. दक्षिण भारतीय हिट चित्रपटांचे फ्रँचायझी, रिमेक आणि बायोपिक या उद्योगाला वाचवू शकतील, अशी कमी अपेक्षा आहे. याला तातडीने मुख्य उपायाची गरज आहे. हा बॉलीवूडचा अंत आहे का ? नाही, याचा अर्थ फक्त बॉलीवूडला आता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर जागा शोधावी लागेल. मोठा पडदा आता मोठ्या स्टारसाठी राखीव आहे.

शाहरुखने आधीच जाहीर केले की, तो पुढील १० वर्षे अॅक्शनपट करणार आहे. पण बॉलीवूडकडे आता प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यासाठी पुरेसे स्टार्स नाहीत. दक्षिणेकडे अजूनही प्रत्येक पिढीतील मोठे स्टार आणि जमिनीशी जोडलेल्या कथा आहेत. त्याच्या तुलनेत २१व्या शतकातील बॉलीवूड फिकट दिसत अाहे. ‘पठान’ आणि ‘टायगर-३’मधून दोन्ही खानांच्या करिअरमध्ये जीवन येईल, असे होऊ शकते, पण बाॅलीवूडला जिवंत ठेवण्यासाठी त्यांना कथेत टि्वस्ट आणावा लागेल, तेव्हाच ते शक्य होईल. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

कावेरी बामजेई पत्रकार आणि लेखिका kavereeb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...