आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Brand Success Story HP, With 24% Share Of The Country's Computer Market, Now Focuses On Printer gaming

ब्रँडच्या यशाची कहाणी - एचपी:देशाच्या संगणक बाजारपेठेत 24 % वाटा, आता प्रिंटर-गेमिंगवर फोकस

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एचपी|टेक्नाॅलॉजी कंपनी {स्थापना ः १९३९ {मार्केट कॅप ः २.२८ लाख कोटी रु.

एचपी म्हणजेच हॅवलेट पॅकार्ड ही भारतासह जगभरातील एक प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी आहे. भारतात प्रत्येक ४ लॅपटॉप-डेस्कटॉप संगणकांपैकी एक एचपीचाच असतो. या श्रेणीतील वर्ल्ड लीडर लेनोव्हो असली तरी २४ टक्के मार्केट शेअरसह ही कंपनी देशात अव्वल स्थानावर आहे. या ८० वर्षे जुन्या अमेरिकन कंपनीने आपल्या व्यावसायिक प्रवासात पाच मोठे बदल केले आहेत. सध्या एचपीच्या दोन कंपन्या आहेत - हॅवलेट पॅकार्ड एंटरप्रायझेस. ती व्यवसायकेंद्रित हार्डवेअर आणि सोल्यूशन्समध्ये डील करते. हॅवलेट पॅकार्ड आयएनसी ही संगणक आणि प्रिंटर कंपनी आहे. या आठवड्याच्या ब्रँड स्टोरीमध्ये एचपीबद्दल जाणून घ्या.

एचपीने १९६४ मध्ये भारतात आपली उपस्थिती नोंदवली होती. मात्र, १९७० मध्ये ब्लू स्टार कंपनीसोबत करार झाल्यानंतरच कंपनीचा व्यवसाय सुरू होऊ शकला. ब्लू स्टार या रेफ्रिजरेटर कंपनीने १९८९ पर्यंत भारतातील एचपीचे सर्व कामकाज हाताळले. १९९७ मध्ये एचपी ब्लू स्टारपासून वेगळी झाली आणि स्वतंत्रपणे काम करू लागली.

सुरुवात : कॅल्क्युलेटर नाव पहिल्या संगणकाला १९३० च्या सुमारास अमेरिकेत साउंड फिल्म व रेडिओचा काळ होता. बिल हॅवलेट व डेव्ह पॅकार्ड स्टॅनफोर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकत असताना भेटले व त्यांनी हॅवलेट पॅकार्ड कंपनीची स्थापना केली. कंपनीचे पहिले उत्पादन ऑडिओ ऑसिलेटर होते, ते त्यांनी डिस्नेसाठी तयार केले होते. यानंतर कंपनीने सेमी कंडक्टरचे प्रयोग सुरू केले. एचपीने १९६८ मध्ये पहिला वैयक्तिक संगणक शोधला. पण, त्याला डेस्कटॉप कॅल्क्युलेटर नाव दिले. बिल हॅवलेटनुसार, तो आयबीएमसारखा दिसत नव्हता, त्यामुळे लोक याला संगणक मानणार नाहीत, अशी भीती होती. १९८४ मध्ये स्कॅनर व कॉम्प्युटरसह कंपनीला मोठे यश मिळाले.

गुंतवणूक : ५.२२ लाख कोटींत १२९ अधिग्रहणे एचपीने १९८६ पासून १२९ पेक्षा जास्त कंपन्या विकत घेतल्या आहेत. त्यासाठी ५.२२ लाख कोटी रु.हून अधिक खर्च करण्यात आला. अलीकडेच कंपनीने पोली ही व्हिडिओ सोल्यूशन्स कंपनी विकत घेतली. गेमिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि रिटेल सोल्यूशन्सच्या व्यवसायात उपस्थिती मजबूत करण्यासाठी कंपनीने हायपरएक्स विकत घेतली. टेराडिकीच्या अधिग्रहणासह रिमोट कॉम्प्युटिंग सेवा व सबस्क्रिप्शन व्यवसायात प्रवेश केला. कंपनीचे इन्स्टंट इंक सबस्क्रिप्शन मॉडेल १ कोटी युजरपर्यंत वाढले आहे. मुद्रण क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी एचपीने ग्राफिक कला तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

2 ऱ्या क्रमांकावर एचपी प्रिंट वा वैयक्तिक संगणक व्यवसायात ५७ देशांत 7 व्या क्रमांकावर आहे एचपी महसुलाच्या बाबतीत तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये 51 हजार लोक काम करतात १८६ देशांत एचपीसाठी 28 हजारहून अधिक पेटंट एचपीच्या नावे 68% महसूल मिळतो वैयक्तिक संगणकातून, तर ३२% प्रिटिंग व्यवसायातून 10.64% समभागांसह बर्कशायर हॅथवे एचपीची सर्वात मोठी भागधारक स्रोत : एचपीच्या २०२१ या आर्थिक वर्षाच्या अहवालानुसार

रंजक : रिसायकल्ड प्लास्टिकपासून उत्पादन निर्मिती समुद्रातून मिळणाऱ्या प्लास्टिकच्या वापरासाठी एचपीने नेक्स्ट वेव्ह प्लास्टिक्स नावाच्या कंपनीशी करार केला आहे. कंपनी केवळ हैतीच्या महासागरातून ४५० मेट्रिक टन प्लास्टिकचा पुनर्वापर करून एचपीने उत्पादने तयार केली. हे ३.५ कोटी प्लास्टिकच्या बाटल्यांहून अधिक आहे. कंपनीच्या अहवालानुसार, एचपीने आपल्या उत्पादनांमध्ये ३२ हजार टन पीसीआर प्लास्टिक वापरले. एचपीच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी ते १३% होते. याव्यतिरिक्त धातूंमध्ये ७५% रिसायकल्ड अॅल्युमिनियम आणि ९०% मॅग्नेशियमही वापरले जाते.

बातम्या आणखी आहेत...