आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Budget Comprehensive, Concrete Steps Needed To Address Skill Gap | Article By Arundhati Bhattacharya

तरुण व रोजगार - भारत ही जगातील टॅलेंट बास्केट:अर्थसंकल्प सर्वसमावेशक, स्किल गॅप दूर करण्यासाठी ठोस पावले गरजेची

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२३ चा अर्थसंकल्प विकासात्मक आणि सर्वसमावेशक म्हणता येईल. तो भक्कम पाया रचून भारताच्या आर्थिक शक्यतांना बळ देतो. आपल्याकडे विलक्षण संधी आहेत. लोकसंख्या झपाट्याने डिजिटायझेशनचा अवलंब करत आहे व अर्थव्यवस्था अंतर्गत मागणीवर चालत आहे. भांडवली गुंतवणुकीतील वाढीचा बहुआयामी परिणाम होईल. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच नागरिकांचे जीवनमानही उंचावेल. भारत ही जगातील टॅलेंट बास्केट आहे. जगातील जास्तीत जास्त प्रतिभावंत आपल्यात आहेत. तरुणांच्या क्षमतेचा उपयोग करण्याची आपल्याकडे उत्तम संधी आहे. स्किल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म व्यवसायांच्या गरजा पूर्ण करतो. प्रतिभेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारला कौशल्याबाबतची विषमता दूर करण्यासाठी आणखी काही पावले उचलावी लागतील. भारताला जगाचे नेतृत्व करायचे असेल तर शाश्वत विकासाला चालना द्यावी लागेल, यामुळे भारतासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. सर्व क्षेत्रांतील हरित वाढीवर लक्ष केंद्रित केल्यास देशासाठी नवीन आर्थिक संधींची दारे खुली होऊ शकतात. आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की, आपण गेल्या काही वर्षांत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा व फिन टेक इनोव्हेशनमध्ये खूप प्रगती केली. या अर्थसंकल्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ५-जी, स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून ती आणखी पुढे नेण्यात आली आहे. विश्वासार्ह प्रशासन आणि व्यवसाय सुलभतेवर भर दिल्यास गुंतवणूक वाढेल. विशेषत: वाढत्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक आकर्षित करण्याची ताकद आहे. या अर्थसंकल्पाने बिझनेस इंडियाला देश-विदेशात चमकण्याची संधी दिली आहे. आपण फक्त त्यानुसार काम करणे आवश्यक आहे.

अरुंधती भट्टाचार्य सीईओ अँड चेअर पर्सन,सेल्सफोर्स इंडिया {भारताला जगाचे नेतृत्व करायचे असेल तर शाश्वत विकासाला चालना द्यावी लागेल, यामुळे नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...