आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्पचा परिणाम:पाच वर्षांमध्ये दहापट वाढली खासदारांवरील धमक्यांची प्रकरणे

स्टीफनी लाय, ल्यूक ब्रॉड, कार्ल हल्से2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सियाटल, अमेरिकेतील मूळ भारतीय डेमोक्रॅटिक खासदार प्रमिला जयपाल यांना संतप्त ई-मेल पाठवणारी व्यक्ती त्यांच्या घराबाहेर अनेकदा आढळली. तो सेमी ऑटोमॅटिक गन घेऊन उभा असतो. ओरडून धमक्या देतो. बांगोर, मैने इथे एका अज्ञात व्यक्तीने रिपब्लिकन सिनेटर सुसान कॉलिन्सच्या घराची खिडकी तोडली. न्यूयॉर्क शहरातील क्वीन्स भागात एक व्यक्ती डेमोक्रॅटिक खासदार अलेक्झांड्रिया ओकेसियो कॉर्टेज यांना वारंवार धमकावते. एकदा तर ती त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली होती.

हिंसक आणि जहाल राजकीय भाषणांत वाढ झाल्याने डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन या दोन्ही पक्षांच्या खासदारांना धोके व संघर्षाचा सामना करावा लागला. ६ जानेवारी २०२१ रोजी संसदेची इमारत कॅपिटोलवरील हल्ल्यानंतर दोन्ही पक्षांचे खासदार घरांच्या आसपास शस्त्र असलेल्या लोकांचे, अज्ञात लोकांकडून पाठलाग करणे व हल्ल्यासारख्या घटनांचे शिकार झाले. पुढील महिन्यात मध्यावधी निवडणुकीपूर्वी हा भीतिदायक ट्रेंड आणखी वाढण्याची अनेकांना शक्यता आहे. पाचवेळा खासदार राहिलेल्या कॉलिन्स सांगतात, एखादा खासदार ठारही होऊ शकतो. आधी शिवीगाळ करणारे फोन कॉल येत होते. आता ते हिंसाचाराच्या धमक्या आणि वास्तविक हिंसाचाराचा इशारा देत आहेत. संसदेच्या सुरक्षेशी संबंधित कॅपिटॉल पोलिस व फेडरल कायदा एनफोर्समेंट विभागाच्या मते, २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर २०२१ मध्ये खासदारांना धमकावण्याची प्रकरणे दहापटींनी वाढून ९६२५ झाली. २०१६ च्या निवडणूक अभियानात हिंसक व जहाल भाषणे देण्यात आली. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८२० गुन्हे नोंदवले. निवडणूक जवळ येताच ही प्रकरणे वाढू शकतात.

मोजक्या लोकांनाच अटक धोके व धमक्यांच्या पुरानंतर केवळ काही प्रकरणांतच लोकांना अटक झाली आहे. वाॅशिंग्टनमध्ये कॅपिटॉल पोलिसांचे प्रवक्ते टिम बार्बर म्हणाले, पोलिसांनी गेल्या ३ वर्षांत खासदरांविरोधातील धमक्यांची वाढ पाहता अनेक लोकांना अटक केली आहे. अशा अनेक घटना मानसिकदृष्ट्या कमकुवत लोकांकडून घडल्या.

बातम्या आणखी आहेत...