आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम विक्षोपामुळे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. मात्र, राजस्थानमध्ये 1006 हेक्टापास्कल कमी हवेचा दाब निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावरील पावसाचे सावट तिकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पाऊस पुढे सरकेल व उडीप मिळणार आहे. उन्हाळा ऋतुला सुरुवात होईल. याचा धास्तावलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. पाहुयात बदलत्या हवामानाबद्दल त्यांनी दिलेली माहिती.
मार्चमध्ये पाऊस, गारपीट कशी?
हवामान बदलाचा हा परिणाम आहे. जेथे तापमान वाढते तेथे हवेचा दाब कमी होत असतो. जास्त हवेच्या दाबाकडून अति थंड वारे मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग कमी दाबाच्या क्षेत्रात लोटतात (पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव) त्या वेळी वादळ, वारे, पाऊस व गारपीट होत असते. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याने अवकाळी पाऊस, गारपीट व वादळाचा तडाखा बसत आहे.
यापूर्वी असे कधी झाले होते का?
याआधी २०१४-१५ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने अवकाळीचा जोरदार तडाखा बसला होता.
अवकाळीचे संकट केव्हा दूर होईल?
पश्चिमी चक्रवाताचा हा प्रभाव आता कमी होत असल्याने २० मार्चपासून महाराष्ट्रात बहुसंख्य भागात पावसाची उघडीप मिळेल.
काय उपाययोजना केल्या पाहिजेत?
जेव्हा नुकसान होईल, तेव्हा शेतकऱ्यांना भरपाई द्यावी तसेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची माेहीम हाती घ्यावी, तरच भविष्यातील संकट दूर होऊ शकते.
तापमान
कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 6 अंश सेल्सियसने कमी म्हणजे 30.6 अंश नोंदवले गेले. तर पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उत्तरेतील अतिशीत वारे वाहून येत आहेत. त्यामुळे किमान तापमानही सहा अंशांनी निचांकी 13.3 अंशांवर असल्याची नोंद चिकलठाणा वेध शाळेने घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.