आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:चारित्र्याला प्राधान्य देणे आवश्यक

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निळ्याशार आकाशात चंद्राची वरात आली की भल्याभल्यांची मने डोलू लागतात. अर्थ आणि धर्माच्या जगात वैभव आकाशात पसरलेले आहे आणि वैभव आपल्यासोबत विलास आणते. अर्थाचे जग म्हणजे व्यावसायिक जीवन. आज व्यवसाय असो की नोकरी, महिलांना असुरक्षित वाटते. पण, महिलांना धर्माच्या जगातही त्यांची सुरक्षितता शोधावी लागते हे सर्वात निराशाजनक. आपल्या देशातील अनेक महामंडलेश्वरांना याची चिंता आहे, ते खासगीत किंवा कुजबुजत म्हणतात की, चारित्र्याची चिंता नसलेले काही लोक धर्माच्या विश्वात शिरले आहेत. त्यांच्यासाठी हाही भोगाचा मार्ग झाला. वैभव इथे तर आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात तर हा खेळ खुलेआम सुरू आहे. खरे तर हे दोन्ही ठिकाणी घडते, कारण लोकांनी चारित्र्याला प्राधान्य देणे बंद केले आहे. पोप यांची चिंता असो वा महामंडलेश्वरांची, उपाय आपल्यालाच शोधावा लागेल. म्हणूनच चारित्र्य हे स्वतःच्या प्रयत्नांनी टिकते आणि इतरांच्या योगदानाने व्यक्तिमत्त्व घडते, असे शास्त्रात लिहिले आहे.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...